दामिनी व्हा ; "स्वयंसिद्धा'च्या "सावित्री, दामिनी की कामिनी'   | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Awareness about drama for women harassment

युवती - महिलांवरील होणारे अत्याचार थांबावेत यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. अत्याचाराचा निषेध करण्यासाठी कॅंडल मार्च काढले जातात, मात्र समाजातील नेमके चित्र पाहता महिलांवरील होणारे अत्याचार थांबलेले दिसत नाहीत

दामिनी व्हा ; "स्वयंसिद्धा'च्या "सावित्री, दामिनी की कामिनी'  

कोल्हापूर - युवती - महिलांवरील होणारे अत्याचार थांबावेत यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. अत्याचाराचा निषेध करण्यासाठी कॅंडल मार्च काढले जातात, मात्र समाजातील नेमके चित्र पाहता महिलांवरील होणारे अत्याचार थांबलेले दिसत नाहीत, हे वास्तव आहे. हे अत्याचार रोखायचे असतील महिला, युवतींनीच दामिनी होण्याची गरज आहे. याच आशयावर आधारलेले "स्वयंसिद्धा' संस्थेच्या "सावित्री, दामिनी की कामिनी ?' "बनूया आता कटिबद्धा' या नाटकाला राज्यभरातून प्रतिसाद लाभतो आहे. 

हे पण वाचा - हापूसने सोडले तोंडाला पाणी; एका आंब्याची तब्बल एवढी किंमत

दिल्लीतील निर्भयावर झालेल्या अत्याचारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. ठिकठिकाणी कॅंडल मार्च निघाले. निषेध व्यक्त झाले. मात्र महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना झाली नाही. अत्याचाराचे प्रमाण वाढत गेले. जर महिलांवरील अत्याचार थांबवायचे असतील तर स्त्रीला सक्षम करणे गरजेचे आहे. प्रसंगी तिने दामिनी होऊन या अपप्रवृत्तीवर तुटुन पडले पाहिजे. हेच ओळखून येथील स्वयंसिद्धा संस्थेने महिलांच्या प्रबोधनासाठी "सावित्री, दामिनी की कामिनी ?' ही नाटिका बसवली. 

हे पण वाचा - शिवसेनेच्या भूमिके विरोधातच शिवसैनिक...

आपली नोकरी, व्यवसाय आणि घर सांभाळत संस्थेच्या हौशी महिला कलाकारांनी यात भुमिका वठवल्या. एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाल्यानंतर तिची होणारी मानसिकता, तिच्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन आणि पुरूषांची मानसिकता यावर परखडपणे भाष्य या नाटिकेत केले आहे. स्त्रियांकडे पाहण्याची पुरूषांची दृष्टी बदलायला हवी, हाच संदेश या नाटिकेतून देण्याचा प्रयत्न केला. 2012 ला घडलेल्या या घटनेनंतर रूद्रांश ऍकॅडमीचे दिपक बिडकर यांनी या नाटिकेचे कथानक लिहीले. संस्थेच्या अध्यक्षा कांचनताई परूळेकर यांच्या मार्गदर्शनाने हे नाटक आणखी प्रभावी झाले. आतापर्यंत राज्यातील विविध शहरांत या नाटकाचे 34 हून अधिक प्रयोग सादर झाले आहेत. समन्वय स्वयंसिद्धाच्या तृप्ती पुरेकर, सायली पाटील व प्रतिमा गांधी करत आहेत. 

हे पण वाचा - अबब... ७४ वर्षाचा कॉलेज कुमार पाहिलात का?

दिल्लीतील निर्भयावर झालेल्या अत्याचारानंतर महिलांना सक्षम करण्यासाठी संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले. राज्यभरातील शाळा महाविद्यालयातून 15 हजार युवतींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. त्यांचे प्रबोधन व्हावे यासाठी "सावित्री, दामिनी की कामिनी ?' या नाटिकेचे सादरीकरणही केले जाते. 
- तृप्ती पुरेकर, समन्वयिका 

नाटिकेतील कलाकार महिला 
विभा देशपांडे, विनया शिपुरकर, सुजाता धर्माधिकारी, आशा थोरवत, सुस्मिता हिरेमठ, प्रिती बागी, शैलजा सुतार, शितल पाटील, स्वाती तोडकर, सुवर्णा जाधव, कोमल औंधकर, शामल औंधकर, तारा निवेकर, हरिप्रिया दिवेकर, मानसी सावंत. 


 

टॅग्स :Kolhapur