हेलकावे देणारा मृतदेह अन..."आखरी रास्ता' खड्डयात 

bad condition of road in kolhapur
bad condition of road in kolhapur

रमणमळा (कोल्हापूर) - "आखरी रास्ता' हे चित्रपटाचे नाव असले तरी कोल्हापुरात याच नावाने असलेल्या रस्त्याला वेगळी ओळख आहे. पंचगंगा स्मशानभूमीकडे जाणारा शेवटचा रस्ता म्हणून "आखरी रास्ता' असे रस्त्याचे आणि मंडळाचे नामकरण झाले. जीवनाच्या शेवटच्या प्रवासाचा हा रस्ता साक्षीदार. मात्र हा रस्ताच आता जाग्यावर राहिलेला नाही. अनेकवेळा चर्चा झाली. आंदोलन झाली मात्र रस्त्याचा प्रश्‍न काही सुटत नसल्याचे चित्र आहे. एखादा प्रश्‍नावर कितीवेळी आवाज उठावायचा, हे असा स्वतःचा त्रागा करून लोक आता वैतागले आहे. कुणाच्याही वाट्याला मरणयातना येऊ नयेत असे म्हंटले जाते. मात्र रस्त्यावरून शववाहिका निघाली की मृतदेहाची ज्या पद्धतीने हेळसांड होते. नातेवाईकांना मृतदेहाला हाताचा आधार द्यावा लागतो. ते पाहून माणसाला मरणानंतरही येणाऱ्या यातना पाहून मनाला निश्‍चितपणे वेदना होतात. 

गंगावेसपासून मृतदेहाचा प्रवास सुरू झाल्यानंतर शववाहिकेच्या चालकाला कोणता खड्डा चूकवू आणि कोणता नको यासाठी धडपड करावी लागते. हाती शिंतोडी धरून बसलेल्या वारसाला आणि भाऊबंदातील लोकांना मृतजेहाची अधिक काळजी घ्यावी लागते. खड्यांच्या धक्‍यांमुळे मृतदेहाची मान एकदा उजवीकडे झुकते तर एकदा डावीकडे. मनात दुःखाच्या वेदना साठवत आपल्या माणसाचा शेवटचा प्रवास सुखकर कसा होईल यासाठी लक्ष द्यावे लागते. मृतदेह व्यवस्थित बांधला असेल तर ठीक अन्यथा स्ट्रेचरवरून तो खाली कोसळला तर करायचे काय असाही प्रश्‍न असतो. गंगावेस रेगे तिकटीपासून गाडी हालतडुलतच पुढे जाते. रेगे तिकटीपासून घसरती लागली की शववाहिकेच्या चालकाला स्टेअरिंगवर नियंत्रण ठेवावे लागते. जनवाडकर कॉम्पेलेक्‍स, पंचगंगा तालीम आणि आखरी रास्ता मंडळापर्यतचा प्रवास धोकादायक आहे. गायकवाड वाड्यापर्यंतच्या रस्त्यावर ड्रेनेजची कामे सुरू आहेत. तेथेही रस्ता वर खाली आहे. गायकवाड पुतळ्याजवळ खड्डयांमुळे पुन्हा हेलकावेच वाट्याला येतात. 

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा चढ लागल्यानंतर आणखी वाईट अनुभव येतो. सुरवातीला गाडी घसरतीला लागल्यानंतर गाडीवर नियंत्रण ठेवावे लागते नंतर चढतीचा प्रवास खडतर असल्याने पुन्हा चालकाची कसरत सुरू होते. 

धुळीमुळे नागरिक त्रस्त 
शेवटचा रस्ता अलीकडे चांगला झाला आहे, अन्यथा स्मशानभूमीची कमानीपर्यंत काही खरे नव्हते. मृतदेह शववाहिकेतून उतरल्यानंतरच नातेवाईक सुटकेचा निश्‍वाःस सोडतात. याच रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे सुटे भाग खिळखिळी झाले आहेत. अशा स्थितीत रस्त्याच्या कामाला कधी मुहुर्त मिळतो याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com