`अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात` 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, मात्र अजित पवारच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. ते स्वतःच सगळ्या घोषणा करतात. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कोल्हापूर :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, मात्र अजित पवारच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. ते स्वतःच सगळ्या घोषणा करतात. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफीविरोधात भाजपने दसरा चौकातून मोर्चा काढला. भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. यावेळी पाटील बोलत होते. 

हे पण वाचा -  साहेब, चित्रपटापेक्षाही भयानक परिस्थिती होती... कोल्हापूर एन्काउंटरचा असा थरार.... 

 पुढे बोलताना पाटील म्हणाले, महाविकास आघाडीने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, मात्र तेच मुख्यमंत्री असल्यासारखं वागत आहेत. 

हे पण वाचा -  कोल्हापुरात १३ वर्षांनंतर पुन्हा पोलिस आणि गुंडांत घडलीय चकमक... 

महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफीतून ९० टक्के शेतकरी वंचित राहिले आहेत. जाचक अटींमुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवताना कसरत करावी लागणार आहे. सरसकट कर्जमाफी, निकषात बदल करण्यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

हे पण वाचा - देवा... एक तरी नात ठेवायची होती... 

भीमा कोरेगाव प्रकरणात केंद्राच्या समितीला सहकार्य केलं नाही, तर त्याचे कायदेशीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.

यावेळी बोलताना घाटगे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याची घोषणा केली. पण, कर्जमाफीसोबत दिलेल्या नियम आणि अटीमुळे राज्यातील ९५ टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. दोन लाखापर्यंतचे पिककर्ज माफ केले. पण, ज्या लोकांनी नियमित कर्ज परतफेड केली. त्यांना यापासून वंचित ठेवले. त्या शेतकऱ्यांनी काय गुन्हा केला. वास्तविक प्रामाणिक शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत कर्जमाफी मिळालीची पाहिजे, अशी मागणी समरजितसिंह घाटगे यांनी केली आहे. 

हे पण वाचा - तर... माझ्यावर, माझ्या सहकाऱ्यांवर त्यांनी गोळ्या झाडल्या असत्या... 

ज्या साखर कारखाने, बॅंक, सहकारी सेवा संस्थांमध्ये २५ हजार पगार आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही. संचालक मंडळांना, मायक्रो फायनांन्सकडून कर्ज घेतले आहे. त्यांनाही कर्जमाफी मिळणार नाही. भूविकास बॅंकेकडून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले, तेही कर्जमाफ झाले पाहिजे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrakant patil criticism on ajit pawar in kolhapur