विद्यार्थ्यांसाठी ते ठरतायेत देवदूत, नफा ना तोट्यावर विद्यार्थ्यांसाठी जेवणाची सोय...  

corona effect on student in belgum
corona effect on student in belgum

बेळगाव - लॉकडाऊनमुळे हॉटेल, खानावळी, मेस आदी बंद असल्याने बाहेर गावातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थी वर्गाला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच काही विद्यार्थ्यांना जेवणासाठी भटकंती करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांचा त्रास पाहुन त्यांच्या मदतीसाठी शहरातील काही मेस चालकांनी पुढाकार घेत ना नफा, ना तोटा या तत्वावर मेस सुरु ठेऊन विद्यार्थ्यांना जेवण उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. 

बेळगाव शहराला शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते त्यामुळे वैद्यकीय, दंत वैद्यकीय, इंजिनीअरिंग आदी शिक्षण घेण्यासाठी देशाच्या विविध राज्यातील विद्यार्थी शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. यामध्ये उत्तर भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्‌या प्रमाणात असुन ज्यादातर विद्यार्थी भाडोत्री खोली करून किंवा घर घेऊन राहतात.जे विद्यार्थी महाविद्यालयांच्या वसतिगृहात राहतात त्यांच्या जेवणाची सोय होत आहे. परंतु जे विद्यार्थी घरगुती मेस किंवा हॉटेलवर अवलंबुन होते त्यांची मात्र लॉकडाऊनमुळे गोची झाली आहे. तसेच सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर हॉटेल, मेस बंद झाल्याने अनेक विद्यार्थ्यांसमोर जेवणाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. दररोज जेवण मिळणाऱ्या घरगुती मेस बंद करण्यात आल्याचे फलक काही मेससमोर लावण्यात आले तर हॉटेलही बंद करण्यात आली. त्यामुळे दररोजच्या जेवणाचे वांदे निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर संकट निर्माण झाले होते त्यामुळे अनेकांना जेवनासाठी भटकंती करावी लागत होती याची माहिती मिळताच टिळकवाडी, नेहरुनगर, सदाशिवनगर आदी भागातील काही मेस चालकांनी विद्यार्थ्यांची अडचण ओळखून गेल्या काही दिवसांपासून दोन वेळेचे जेवण उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची अडचण दूर झाली आहे. 

मेसमध्ये गर्दी न करता सोशल डिस्टस्टिंग राखत खोलीवर जाऊन जेवण करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना केल्या जात आहेत. तसेच ठरावीक वेळेत जेवणाचे पार्सल घेऊन जाण्याच्या सुचनाही विद्यार्थी वर्गाला करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीयकृत बॅंकामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सुरु असलेल्या मेसचा लाभ होत असुन लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार आणि रस्ते सुनसान झालेले असताना ना नफा ना तोटा तत्वावर सुरु असलेल्या मेस अनेकांसाठी लाभदायक ठरल्या आहेत. 


मेसमध्ये जेवण करणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते अशावेळी मेस बंद ठेवली तर बाहेर गावातील विद्यार्थ्यांना त्रास झाला असता त्यामुळे लॉकडाऊन काळातही विद्यार्थ्यांसाठी मेस सुरु ठेवली आहे तसेच ज्यांना जेवनाची गरज आहे त्यांनाही जेवण उपलब्ध करुन दिले जात आहे. 
श्रीकांत कदम, मेस चालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com