कोल्हापूर ; पत्नीच्या खुनात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला कोरोनाची लागण

corona virus infection to captive in kolhapur
corona virus infection to captive in kolhapur

शिये (जि. कोल्हापूर) : पॅरोलवर सुटलेल्या मादळे ( ता. करवीर ) येथील त्या कैद्याचा अहवाल  कोरोना पॉझिटिव्ह आल्याने रात्री उशिरा मादळे हे गाव सील करण्यात आले. संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या टोप, कासारवाडी व मादळे येथील सुमारे १८ जणांना प्रशासनाने वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. आज रात्री आठ वाजता हा अहवाल प्राप्त झाल्याने प्रशासकीय यंत्रणा मादळे या गावाकडे रवाना झाली.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

२००७ साली पत्नीचा खून करून जेलमध्ये शिक्षा भोगत असणाऱ्या संबंधित कैद्याला १४ मे रोजी पॅरोलवर सोडण्यात आले होते. रात्री उशिरा हा कैदी मादळे येथे दाखल झाला. त्यावेळी गावातील कोरोना समितीचे अध्यक्ष सरपंच मीनाक्षी जाधव व ग्रामसेविका सारिका बंडगर यांनी संबंधित कैद्याचे तेथील प्राथमिक शाळेत विलगीकरण केले होते. रात्रीची वेळ असल्याने संबंधितास दुसऱ्या दिवशी भुये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. तेथून सीपीआरमध्ये पाठवण्यात आले. तेथे त्याचा स्वॅब घेऊन त्याचे पुन्हा प्राथमिक शाळेत  विलगीकरण करण्यात आले.

 दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जात असताना कासारवाडी येथे हा कैदी एकाच्या संपर्कात, तर टोप येथे दोघांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर  स्वॅब देवून परत आल्यानंतर त्याचा अन्य अकरा जणांशी त्याचा संपर्क आला होता. आज सायंकाळी आठच्या दरम्यान त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेविका, तलाठी व सरपंच आदींनी मादळे येथील  संबंधित रुग्णासह १८ जणांना सीपीआरला नेले. तसेच संपूर्ण गाव बंद केले. 

हे पण वाचा - कोल्हापुरात कोरोनाबाधिताचा 'तो' मृतदेह... स्मशानभूमीत ना नातेवाईक ना हुंदक्यांचा आवाज... सगळं काही भयाण...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com