सावधान! दुचाकी खरेदी करताय; या गोष्टीची खात्री करा 

लुमाकांत नलवडे 
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

ग्राहकाच्या चक्क बनावट सह्या करून दुचाकीची काही कागदपत्रे आरटीओकडे जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुचाकी विक्री करणाऱ्या एका एजन्सीकडून हा प्रकार होत असल्याचे आढळून आले आहे. नवीन दुचाकी विक्री करताना ग्राहकाला दोन हेल्मेट देण्याची सक्ती आहे. हेल्मेट दिल्याबाबतचे बंधपत्र ग्राहकाच्या सहीने सादर करायचे आहे. तरीही अशा बंधपत्रात बदल करून बंधपत्रावर, विम्याच्या कागदपत्रांवर ग्राहकाच्या बनावट सह्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. 

कोल्हापूर - ग्राहकाच्या चक्क बनावट सह्या करून दुचाकीची काही कागदपत्रे आरटीओकडे जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुचाकी विक्री करणाऱ्या एका एजन्सीकडून हा प्रकार होत असल्याचे आढळून आले आहे. नवीन दुचाकी विक्री करताना ग्राहकाला दोन हेल्मेट देण्याची सक्ती आहे. हेल्मेट दिल्याबाबतचे बंधपत्र ग्राहकाच्या सहीने सादर करायचे आहे. तरीही अशा बंधपत्रात बदल करून बंधपत्रावर, विम्याच्या कागदपत्रांवर ग्राहकाच्या बनावट सह्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. 

हे पण वाचा - ब्रेकिंग- दीड लाखांची लाच घेताना पंटरसह मंडळ अधिकारी जाळ्यात 

याबाबत संबंधित एजन्सीला नोटीस पाठवून त्याची शहानिशा करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित कंपनीचा वाहन विक्रीचा परवाना काही कालावधीसाठी निलंबित केला जाऊ शकतो. दुचाकीची विक्री करताना संबंधित ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. त्याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून एजन्सींना वारंवार सुचना दिल्या गेल्या आहेत. तरीही एका एजन्सीने हेल्मेटसाठी आवश्‍यक बंधपत्रात बदल केला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी आमच्यकडे जुनी दोन हेल्मेट आहेत. त्याचा वापर करण्याची माझी जबाबदारी असल्याचे संदर्भ दिले आहेत. अशा पद्धतीचे "बंध'पत्र चुकीचे असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. संबंधित दुचाकी विक्री करणारी एजन्सी ग्राहकांना नव्याने दोन हेल्मेट न देता पुर्वीच आमच्याकडे आहेत. ते वापरत असल्याचे लिहून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच असे बंधपत्र आरटीओ कार्यालयात जमा केली आहेत. बंधपत्रातील चुकांबरोबरच त्या खाली असलेल्या ग्राहकांच्या सह्यांची पडताळणी खुद्द प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केली. तेंव्हा त्या बनावट असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यामुळे खुद्द एजन्सी मधूनच ग्राहकांच्या बनावट सह्या केल्याचे धक्कादायक संदर्भ पुढे आले आहेत. याची शहानिशा करण्यासाठी संबंधित एजन्सीला कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येणार आहे. 

हे पण वाचा - Happy Birthday ; गड-किल्ल्यांसाठी अहोरात्र झटणारे संभाजीराजे छत्रपती 

दरम्यान दुचाकी बरोबर इतर कागदपत्रे ही आरटीओमध्ये पासिंग वेळी जमा केली जातात. प्रत्यक्षात इतर कागदपत्रांची आणि हेल्मेटसाठी दिलेल्या बंध पत्राची सत्यता पडताळणी अधिकाऱ्यांनी केली. तेंव्हा विम्याच्या कागदत्रांवर सुद्धा ग्राहकांची बनावट असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. एकाच एजन्सीकडून असा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर कंपन्यांनी आटीओकडून प्रसिद्धीस दिलेल्या पद्धतीनेच हेल्मेटचे बंध पत्र ग्राहकांना देऊन त्यांच्या सह्या घेतल्या आहेत. त्यामध्ये ग्राहक स्वतःहून मला कंपनीकडून "आयएसआय' कंपनीचे दोन हेल्मेट मिळाले असल्याचे स्पष्ट करतो. त्याबाबत सही सुद्धा करून देतो. मात्र एकाच एजन्सीने बंधपत्रात बदल केला आहे. त्यांच एजन्सीकडून ग्राहकांच्या बनावट सह्या केल्याची माहिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. हीच एजन्सी ग्राहकाला दोन हेल्मेट देत नसल्याचेही दिसून आले आहे. 

दुचाकी वितरकांकडून चुकीच्या पद्धतीने हेल्मेटबाबतचे बंधपत्र लिहून घेऊन आमच्याकडे जमा केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच त्यावरील ग्राहकांच्या सह्याही प्रथमदर्शनी बनावट असल्याचे आम्ही केलेल्या तपासणीत दिसून आले आहे. ही बाब गंभीर असल्यामुळे संबंधित एजन्सीला कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचा परवाना निलंबित होऊ शकतो. 

डॉ.स्टीव्हन अल्वारीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, 

खटाटोप कशासाठी 
केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या नियम 138 नुसार दुचाकी उत्पादक कंपनीने ती विक्री करताना ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधन कारक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, अशा सुचनाही प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी विक्री करणाऱ्या एजन्सींना वारंवार दिल्या आहेत. तरीही हेल्मेटच्या बंधपत्रावर बनावट सह्या केल्याची माहिती पुढे आली आहे. ग्राहकांना हेल्मेट द्यावे लागते म्हणून हा खटाटोप एजन्सींकडून केला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: counterfeit Signature from two wheeler distributors