
मुंबईच्या आविष्कारचा आणखी एक करिश्मा
सख्ख्या चुलतभावांना नोकरीच्या आमिषाने गंडा
कोल्हापूर : बालभारतीत लिपिक म्हणून नोकरीच्या आमिषाने सख्ख्या चुलत भावांची पाच लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. अाविष्कार पाटील (रा.बी.डी.डी.चाळ जांबोरी, मैदान, वरळी, मुंबई) या संशयितावर गुन्हा दाखल झाला. चार दिवसांपूर्वीच आविष्कारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. आता आणखी एका फिर्यादीमुळे आणखी दोघांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे आल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी सचिन बंडू जाधव मूळ खोपटी, तंडा, जातेगाव ता. गेवराई, जि. बीड येथील आहे. सध्या तो केव्हिज पार्कमध्ये राहतो. शिक्षण घेत असलेल्या या तरुणाची फेब्रुवारी २०२० ते १० नोव्हेंबर २०२० दरम्यान संशयित सचिनबरोबर ओळख झाली. तोही कोल्हापुरात होता.
हेही वाचा- विमानात संकटकाळात धावला ‘देवदूत’-
फिर्यादी सचिन त्याचा चुलतभाऊ विकास पांडू जाधव यांना बालभारतीमध्ये लिपिक पदावर नोकरी लावतो, असे आविष्कारने सांगितले. दोघांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी गुगल पे, आर.डी.टी.एस. व रोखीने असे एकूण ५ लाख ८० हजार रुपये फिर्यादी सचिन व त्याच्या चुलतभाऊ विकास यांच्याकडून घेतले, मात्र नोकरी न लावता तो पळून गेल्यामुळे फिर्यादी सचिव व विकास यांना फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली.
संपादन- अर्चना बनगे