उद्यापासून सीपीआर होणार कोरोना रुग्णालय ; सीपीआरमधील शस्त्रक्रिया होणार खासगी रुग्णालयात... 

cpr hospital kolhapur are totally reserved for corona
cpr hospital kolhapur are totally reserved for corona

कोल्हापूर - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि जिल्ह्यातील अशा आजाराची लक्षणे असलेल्या संशयितांवर शहरातील छत्रपत्री प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार केले जाणार आहे. त्यामुळे सीपीआर हे आता कोरोना रुग्णालय झाले आहे. त्यामुळे, सीपीआरमध्ये होत असलेल्या बाह्यरुग्णांची तपासणी आता कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात उपचार केले जाणार आहे. तसेच सीपीआरमधील शस्त्रक्रिया शहरातील खासगी मल्टिस्पेशालिस्ट असणाऱ्या 21 रुग्णालयात केले जाणार आहे. बुधवारपासून (ता. 2) याची अमलबजावणी सुरू केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोरोनाचे रुग्ण एकाच छताखाली उपचार करण्यासाठी बुधवारपासून (ता. 2) सेवा रुग्णालय व सीपीआरमध्ये बाह्यरूग्ण तपासणी सुरू केली जाणार आहे. त्यामुळे सीपीआरमधील रुग्णांची हेळसांड होणार नाही, याची ही दक्षता घेतली जाणार आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या किंवा लागण झालेल्या रुग्णांना एकाच ठिकाणी उपचार घेता यावे यासाही हा निर्णय घेतला आहे. सध्या सीपीआरमध्ये सुमारे चारशे खाटांची सोय होवू शकते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सीपीआरमध्ये किरकोळ आजारासाठी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय, सीपीआरमधील एखाद्या रुग्णाची शस्त्रक्रिया करायची असेल तर ती शहरातील मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालयात केली जाणार आहे. शहरातील सर्व खासगी दवाखान्याच्या डॉक्‍टरांनी याला मान्यता दिली आहे. 

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, बाह्यरुग्णांची तपासणी ठरविक वेळेत केली जाईल. मात्र, तात्काळ सेवा मात्र चोवीस तास सुरू राहिल. यात शंका राहणार नाही. 

  • कोरोनाच्या 13 तपासण्या निगेटिव्ह 
  • सीपीआरमधील रुग्ण सेवा रुग्णालयात 
  • खासगी 21 मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालयात शस्त्रक्रिया 
  • परदेशातील 819 पैकी 414 लोकांचे (होम क्वॉरंटाईन) चौदा दिवस पूर्ण झाले 
  • जिल्ह्याबाहेरील 64 हजार लोकांना होम क्वॉरंटाईन 
  • यातील 5 हजार 674 चौदा दिवस पूर्ण 

ऍपद्वारे आपली माहिती भरावी 
 

जिल्ह्यातील लोकांच्या कोरोनाची तपासणी करण्यासाठी ऍपद्वारे मदत घेतली जात आहे. या ऍपमध्ये फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरत असतानाच ते ऍपमधील माहिती जिल्हा प्रशासनाकडे मिळणार आहे. त्यानूसार संबंधीतांना उपचारासाठी हलविण्यात येईल. 

कामगारांचे पगार कपात करू नये 

जिल्ह्यात विविध उद्योग, साखर कारखान्यासह इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचे पगार कपात करून नये. तसेच, साखर कारखाने, उद्योग किंवा इतर लघु उद्योगाच्या ठिकाणी काम करणाऱ्या बाहेरील कर्मचाऱ्यांची सोय स्वत: करायची आहे. प्रत्येकांनी ही जबाबदारी स्विकारली पाहिजे. एखाद्या कारखान्याचा कर्मचारी बाहेर फिरताना दिसला तर त्या संबधींत कारखान्यांवर कारवाई केली जाईल. असा इशार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. 

भाडेकरूंकडून भाडे घेवू नये 
 
शहरासह जिल्ह्यात जे-जे भाडे करू राहत आहेत. त्यांच्याकडून घरमालकांने भाडे घेवू नये. कोरोनामुळे सर्वच ठिकाणी बंद आहे. त्यामुळे घर भाडेकरूना भाडे देता येणार नाही, यासाठी केंद्र सरकारने आदेश दिले आहेत. त्याचे पालन केले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. 

774 वाहने जप्त 

शहरात आणि जिल्ह्यात संचारबंदी असताना बिनकामाचे फिरणाऱ्या 774 वाहने जप्त केली आहे. त्यांच्याकडून 6 लाख 50 हजार रुपये दंड आकारला आहे. कारवाई अजूनही सुरू आहे. 

44 व्हेंटिलेटर मागणी केली आहेत. त्यापैकी 9 व्हेंटिलेटर आले आहेत. उर्वरित व्हेंटिलेटर दोन दिवसात येत आहे. सध्या एवढी गरज नाही. तरीही मागवून ठेवली असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. 

 270 जणांना सक्तीचे संस्थात्मक क्वॉरंटाईन 

जिल्ह्याबाहेरुन म्हणजे पुणे, मुंबई याठिकाणाहून आलेल्या 200 प्रवाशांना सक्तीने संस्थात्मक क्वॉरंटाईन केले आहे. यामध्ये, पंजाबराव देशमुख मराठा वसती गृहात 78, शासकीय तंत्रनिकेत वसतीगृहात 42, अशोकराव माने विद्यालय 37, गुरूकूल पेठ वडगाव 24, जयसिंगपूर येथील सिध्देश्‍वर मंदिर हॉल 18, मौनी विद्यापीठ 11 असे लोकांना संस्थात्मक कॉरंटाईन करण्यात आले आहेत. ज्यांना ही सेवा पंसत नाही त्यांची हॉटेलमध्ये सोय केली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com