भांडाफोड : अखेर 'व्हिजन' आले गोत्यात ; खुडेचा पर्दाफाश

लुमाकांत नलवडे
Wednesday, 16 September 2020

सकाळने दिली होती वृत्तमालिका 

कोल्हापूर : व्हिजन ऍग्रो प्रोडक्‍ट मधून अधिक नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने 84 लाख 56 हजार 200 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

व्हिजन ग्रीन ऍग्रो प्रोडक्‍टस व व्ही.ऍण्ड के ऍग्रोटेक प्रोडक्‍टस्‌ प्रा.लिमिटेड कंपनीचे विकास जयसिंग खुडे, विद्या विकास खुडे, (दोघे.रा.पोर्ले ता.पन्हाळा) प्रसाद आनंदराव पाटील (उभा मारुती चौक, शिवाजी पेठ) सुशील शिवाजी पाटील (यवलूज.ता.पन्हाळा), डॉ.तुकाराम शंकर पाटील (माजगाव,ता.पन्हाळा) यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. फसवणूक झाल्याची फिर्याद राजू बळीराम सुर्यवंशी (लक्षतीर्थ वसाहत) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर हा गुन्हा नोंद झाला. 

हेही वाचा- नियमित आहारात अंडी खाताय मग ही बातमी वाचाच....

काही महिन्यापूर्वी दैनिक सकाळने सर्व प्रथम ऍग्रो व्हिजनच्या नावाखाली फसवणूक सुरू असल्याचे वृत्त दिले होते. त्याची मालिकाही प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर व्हिजनचे सविस्तर कारनामे पुढे येत गेले. एक दिवस हे व्हिजन गोत्यात येणार असल्याचे संदर्भ लेखमालेतून दिले होते. ते आता खरे ठरले आहे. 

हेही वाचा- ताटांचे गणित बसेना  ; धड पार्सलही नाही आणि हॉटेलमध्ये बसण्यासाठी परवानगी नाही, करायचे काय...? -

ऍग्रो प्रोडक्‍टच्या नावाखाली अधिक नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने अनेकांकडून गुंतवणूक करून व्हिजनचे काम चालले होते. व्हिनस कार्नर येथील मातोश्री प्लाझा मध्ये त्याचे कार्यालय होते. या कार्यालयातून सुमारे 84 लाख 56 हजार 200 रुपयांची फसवणूक सर्वांनी संगणमताने केली असल्याचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. 

संपादन -  अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Sakal first reported that fraud taking place under the name of Agro Vision