डोंगरावर पेटला वणवा; तब्बल एवढ्या एकरातील वनसंपदा नष्ट 

Decorate on maswadi mountain
Decorate on maswadi mountain

उत्तूर (कोल्हापूर) : उत्तूर-आजरा रस्त्याला लागून असलेल्या साबुदाना फॅक्‍टरीजवळील मासेवाडी डोंगराला शुक्रवारी सायंकाळी वणवा लागला. त्यात सुमारे 15 ते 20 एकरचे क्षेत्रातील नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान झाले. हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. रस्त्याला लागून असलेल्या डोंगरावर दुर्मिळ वनसंपदा आहे.

तेथे वन्यजीवांचा वावर आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वणवा लागल्याने डोंगरावरील झाडे, झुडपे, औषधी वनस्पती जळून खाक झाली. सुमारे 15 ते 20 एकरचे क्षेत्र भकास झाले आहे. हा वणवा लागला की, लावला गेला याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, पर्यावरण प्रेमी डॉ. धनाजी राणे यांनी घटनास्थळी भेट देवून आग विझविण्याचाही प्रयत्न केला, परंतु आग भयानक होती. त्यामुळे ती संपुर्ण विझवणे शक्‍य झाले नाही. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com