अंबाबाई मंदिर कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी  

Demand for implementation of Ambabai Temple Act
Demand for implementation of Ambabai Temple Act

कोल्हापूर - श्री करवीर निवासीनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात भाविकांची संख्या लक्षात घेता एप्रिल 2018 मध्ये तत्कालीन राज्य शासनाने साईबाबा संस्थान शिर्डी, श्री सिध्दीविनायक न्यास मुंबई व पंढरपूर देवालय यांच्या धरतीवर एका मंदीरासाठी एक कायदा अशा प्रकारे कायदा निर्माण केला आहे. त्याच धर्तीवर श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिराचे चांगले व्यवस्थापक करण्यासाठी 2019 मध्ये विधानसभेत मंजूर केलेल्या कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. 

राज्यातील इतर विविध मंदिरांसाठी जसा एक मंदिर एक कायदा आहे, त्याच धर्तीवर कोल्हापूरातील श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिरासाठीही वेगळा कायदा होऊन भाविकांसाठी अधिक सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी व मंदिराचे व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना श्री. आबीटकर यांनी मांडली होती. याच अनुषंगाने या लक्षवेधी व जनांदोलनाची दखल घेत मागील शासनाने त्याबाबतचा कायदा करण्याचे घोषित केले. 

या सर्व पार्श्वभूमीवर तत्कालीन विधी व न्याय विभागाचे राज्यमंत्री रणजित पाटील यांनी श्री करवीर निवासीनी मंदिरासाठी वेगळा कायदा करत श्री करवीर निवासिनी आंबाबाई मंदिर व्यवस्थापन विधेयक राज्यपालांच्या संमतीने पारित केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करता येतील. परिणामी कोल्हापूर शहराच्या पर्यायाने जिल्हाच्या विकासाला चालना मिळणार आहे. असे या निवेदनात म्हटले आहे. कायदा तपासून त्याची कार्यवाही करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री ठाकरे यांना दिल्याचे या निवेदनात म्हटले आहे.  


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com