मोबाईल स्क्रीन झाले प्रचाराचे व्यासपीठ

election publicity on mobile
election publicity on mobile

कोल्हापूर - पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोचला आहे. पक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे मेळावे पूर्ण झाले. आता मतदारांच्या मोबाईलची स्क्रीन प्रचाराचे व्यासपीठ बनली आहे. मोबाईल टिझर, व्हिडिओ, एसएमएस आणि व्यक्तिगत फोन कॉल या आधारेच उमेदवार प्रचार करीत आहेत. सोशल मीडियावरील विविध पर्यायांचा वापर करून आपली भूमिका मतदारांपर्यंत पोचवत आहेत.

निवडणूक कोणतीही असो प्रचाराचा धुरळा हा ठरलेलाच आहे. आरोप-प्रत्यारोप, रॅली, मेळावे, लाखोंच्या सभा अशा विविध माध्यमातून उमेदवार मतदाराशी जोडला जातो. मात्र यावेळची पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक सर्वार्थाने वेगळी आहे. कोरोनामुळे प्रचाराला मर्यादा आहेत. त्यातच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी पंधराच दिवस उमेदवारांना मिळाले आहेत. अशा काळात सोशल मीडिया आणि मोबाईल फोन यांचा प्रभावी उपयोग प्रचारासाठी झाला नसता तरच नवल. 

रवातीच्या टप्प्यात पक्षांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. मात्र आता अंतिम टप्प्यात पूर्णपणे सोशल मीडियावरून प्रचाराच्या फैरी झडत आहेत. उमेदवार मोबाईल टिझरचा वापर करून भूमिका मतदारांपर्यंत पोहचवतात. व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करतात. सण, महापुरषांच्या जयंती या निमित्ताने शुभेच्छा आणि अभिवादनाचे संदेश मतदारांना पाठवतात. 
उमेदवारांच्या कार्यालयातून मतदारांना मतदानाची तारीख, त्यांचा क्रमांक तसेच मतदान केंद्र फोन आणि एस.एम.एसच्या माध्यमातून सांगितले जाते. दिवसातून एकदा तरी उमेदवाराचे नाव मतदारांच्या कानी पडावे अशी यंत्रणा पक्षांनी लावली आहे. 

वैयक्तिक टीका नाही
निवडणूक म्हटले की उमेदवार एकमेकांवर वैयक्तिक टीका करतात. आपण प्रतिस्पर्ध्यापेक्षा कसे चांगले हे सांगतात. मात्र, संग्रामसिंह देशमुख आणि अरुण लाड यांनी एकमेकांवर टीका केलेली नाही. त्यांच्या पक्षाचे नेते जरी एकमेकांना लक्ष्य करीत असले तरी दोघांनीही व्यक्तिगत टीका टाळलेली आहे.

प्रचारातील मुद्दे; भाजपचा प्रचार                                      
 राज्य सरकारच्या कारभारावर टीका
 संग्रामसिंह देशमुख यांचे सहकार व जिल्हा परिषदेतील काम
 देशमुख यांचे कमी वय व लाड यांचे वय 
 पदवीधरांचा प्रश्‍न


महाविकास आघाडीचा प्रचार
 चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांसाठी काय केले?
 भाजप नेतृत्वावर टीका  पदवीधरांचे प्रश्‍न
 अरुण लाड यांना लाभलेला क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड 
    यांचा वारसा

संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com