शिवाजी विद्यापीठाची बी. एड व एम. एडची डिग्री हवी असेल तर 60 हजार रुपये द्या! काय आहे व्हायरल मेसेजचे सत्य

fake sms on social media shivaji university degree
fake sms on social media shivaji university degree
Updated on: 

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाची बी. एड व एम. एडची डिग्री हवी असेल तर 60 हजार रुपये द्या. तुम्हाला डिग्री मिळेल. यासाठी या संपर्क क्रमांकावर दूरध्वनी करा, असा संदेश काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये फिरत होता. काही जणांनी आज त्याची माहिती परीक्षा विभागाला दिली. परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित क्रमांकावर संपर्क करून खात्री केली. 

पदवी विकत असल्याचा संदेश पाहून अनेकांना आश्‍चर्य वाटले. गेल्या काही दिवसांपासून हा संदेश सोशल मीडियावर फिरत होता. आज ते पाहून अधिकाऱ्यांना धक्काच बसला. यामध्ये काही तथ्य आहे का हे पाहण्यासाठी संबंधितांनी त्या क्रमांकावर दूरध्वनी केला. त्यावेळी समोरून एका पुरुषाने फोन घेतला. "पदवी देतो पण 60 हजार रुपये लागतील. पदवी खोटी असून भविष्यात याबाबत कोणीही आक्षेप घेतला तर आम्ही जबाबदार नाही,' असेही त्याने सांगितले. त्याचे उत्तर ऐकून परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांना या संदेशाची खात्री पटली. याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत विद्यापीठ प्रशासन विचार करत आहे. 

माझे कनेक्‍शन दिल्लीपर्यंत 
पदवीबाबत खोदून विचारल्यावर त्या व्यक्तीने आपण नांदेडमध्ये राहतो तसेच माझे दिल्लीपर्यंत कनेक्‍शन आहे, असे सांगितले. हे आणखीनच गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांना जाणवले. 
 
शिवाजी विद्यापीठाची कोणतीही पदवी कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमातून दिली जात नाही. विद्यापीठाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यापीठ पदवी देते. त्यामुळे विद्यार्थी, पालकांनी कोणत्याही अफवेवर विश्‍वास ठेऊ नये. 
प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव, प्रभारी परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ 

संपादन - धनाजी सुर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com