'शेतीशी संबधित सर्व काळे कायदे रद्द झालेच पाहिजेत' 

farmer new law protest kolhapur
farmer new law protest kolhapur

कोल्हापूर : शेतकऱ्यांना नामशेष करणारे काळे कायदे रद्द झालेच पाहिजे, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीतर्फे निदर्शने केली. शिवाजी चौक येथे निदर्शने करुन केंद्र सरकारचा निषेध केला. नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला फेरीवाला कृती समितीने पाठींबा दिला. 

रघुनाथ कांबळे म्हणाले, ""सुप्रिम कोर्टाने शेती कायद्यांना दिलेली स्थगिती ही स्थगिती नसून सरकारशी केलेली मिलीभगत आहे. सरकारने जी समिती स्थापन केली आहे. या समितीतील सदस्य हे सरकारला पाठींबा देणारे समर्थक आहेत. यासाठी शेती कायदे रद्द केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. आम्ही सर्वजण भारतातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. शेतकऱ्यांना प्रत्येकाने बळ दिले पाहिजे. शेतकरी जगला तरी शेती जगेल, देश जगेल, हे लक्षात घेतले पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी झाली पाहिजे. देशातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींचे अस्तित्व टिकवले पाहिजे. बाजर समितीमध्ये सुधारणा केल्या पाहिजे. शेतीचे सर्वप्रकारचे कंत्राटीकरण थांबवले पाहिजे. हे शेतीशी संबधित सर्व कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे अजिबात नाहीत. सर्व शेती ही भांडवलदार वर्गाच्या घशात घालण्याचा हा केंद्र सरकारचा डाव आहे. हा डाव आपण सर्वांनी उधळून लावला पाहिजे. शेती कायदे स्थगिती केली नाही तर जो भांडवलदार वर्ग शेतकऱ्यांकडून सुरवातीला जास्त दराने धान्य घेतील. पण हे थोडे दिवस चालेल. नंतर मात्र कमी दरात शेतकऱ्यांकडून धान्य घेऊन नंतर चढ्या दराने धान्य बाजारात आणतील. यामध्ये सर्वाधिक फायदा हा भांडवलदार वर्गाचा होईल. भारतातील सर्व धान्य कोठारे ताब्यात घेतील. कृत्रिम धान्य टंचाई निर्माण करतील. कंत्राटीकरण शेतीलासुद्धा आमचा विरोध आहे.'' 

शिवाजी चौकात शहरातील सर्व फेरीवाले उपस्थित होते. दिलीप पोवार, आर. के. पोवार, सुरेश जरग, अशोक भंडारी आदींनी मनोगत व्यक्त केले. 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com