कोल्हापूरात दोन वर्षांत पाच तरुणी झाल्या बेपत्ता...

Five girls kidnapping in kolhapur marathi news
Five girls kidnapping in kolhapur marathi news

कोल्हापूर :  एका विवाहितेसह जिल्ह्यातील पाच तरुणी दोन वर्षांपासून बेपत्ता आहेत. या तरुणींचे अपहरण झाल्याचा गुन्हा पोलिसांनी त्या-त्या पोलिस ठाण्यात नोंदविला आहे. या तरुणींविषयी माहिती असलेल्यांनी ती पोलिस नियंत्रण कक्षाला कळवावी, असे आवाहन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केले आहे. 

पाच तरुणी दोन वर्षांपासून बेपत्ता
अपहरण झालेल्या मुलींत एक जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील, दोन इचलकरंजी परिसरातील, तर गडहिंग्लज व कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका तरुणीचा समावेश आहे. ३ मार्च २०१८ पासून या तरुणी बेपत्ता आहेत.

पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांविरोधात पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आज या पाचही तरुणींचे वर्णन, फिर्यादी यांचे नाव, कोठून त्या बेपत्ता झाल्या त्या ठिकाणासह माहिती प्रसिद्ध केली आहे. 

संपर्क साधण्याचे आवाहन 
दोन वर्षे नातेवाईकांसह पोलिसांनीही शोध घेऊन या तरुणींचा पत्ता लागलेला नाही. स्वतःहून या तरुणीपैकी एकीनेही नातेवाईक किंवा पोलिसांशी संपर्क साधलेला नाही किंवा नातेवाइकांनीही या तरुणींच्या बेपत्ता प्रकरणाशी संबंधित कोणाचे नावही फिर्यादीत न दिल्याने या कक्षाकडूनच तरुणींचा शोध सुरू आहे. या तरुणींविषयी माहिती असलेल्यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रमुख व सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com