कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब

General meeting of Kolhapur Municipal Corporation
General meeting of Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा आज महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भाजपचे नगरसेवक संतोष गायकवाड यांच्या कोरोनाच्या संसर्गाने निधन झाल्याबद्दल सभागृहात दुखवटा ठराव मांडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली.


सभेच्या प्रारंभी  गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर सभेला सुरवात करण्यात झाली. यावेळी ही सभा संतोष गायकवाड यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचा ठरावही मांडण्यात आला. यावेळी नगरसेवक विजय सूर्यवंशी यांनी नगरसेवक संतोष गायकवाड हे समाजातून तळागाळातून निवडून आले होते. त्यांनी सभागृहात जो प्रश्न उपस्थित करून लावून धरला तो मान्य करून झोपडपट्टीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करून या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करावे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे संतोष गायकवाड यांच्या आकस्मिक निधनामुळे आजची सभा तहकूब करावी. अशी मागणी केली. 
त्याचबरोबर आशा घटना घडत आहेत त्याची खबरदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. 

नगरसेवक भूपाल शेटे यांनी नगरसेवक संतोष गायकवाड यांची पोकळी भरून ना निघणारी आहे. त्यांनी आपल्या प्रभागातील विकास कामासाठी खूप प्रयत्न करून त्यांनी आपल्या भागाचे नंदनवन केले आहे. त्यांनी कोरोनाच्या या परिस्थितीत जीव धोक्यात घालून मदत केली, त्यामुळे त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या भागातील जो कर्मचाऱ्यांचा सेवेत कायम करण्याचा प्रश्न आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून त्यांना श्रद्धांजली ठरेल. तर आरोग्य विभागाचे तसेच अनेक कर्मचारी हे कोरोनामध्ये सेवा बजावत आहेत. त्यांच्याही जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी दहा लाख रुपयांची तरतूद करावी. संतोष गायकवाड यांच्या निधनामुळे ही सभा तहकूब करावी अशी मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केली. 

नगरसेवक नाना कदम यांनी त्यांच्या भागातील अनेक नागरिक महापालिकेत कर्मचारी आहेत. त्यातूनच त्यांना कोरोनाच्या लागण झाली असेल. कर्मचारी वर्ग हा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. संतोष गायकवाड यांनी नेहमीच कामगार चाळ हा प्रश्न घेऊन सभागृहात आवाज उठवत असे त्यामुळं या कामगारांचे कल्याण करून संतोष गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी मागणी केली. 

या सभेत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संतोष गायकवाड यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. खेळाडू वृतीचा कार्यकर्ता होता. कोरोना योद्धा म्हणून जे काम करतात सभागृह जो निर्णय घेईल त्याच्याही सर्वजण असतील, अशा भावना व्यक्त केल्या. 

 
 महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या, संतोष गायकवाड यांची निधन झाले. फुटबॉल खेळाडू म्हणून त्यांची पहिला ओळख होती. कोरोनाच्या काळात त्यांनी महापालिका यंत्रणेला सहकार्य केले. त्यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग होता. 

 सभा तहकूब

नगरसेवक संतोष गायकवाड यांना सभागृहात श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली.  

या सभेत सादस्यांनी संतोष गायकवाड यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.  

महापौर आजरेकर यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असलेला नगरसेवक हरपला असल्याच्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब केली. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com