'कोल्हापुरात ब्रिगेड स्टाईलने आंदोलनाचा इशारा'' :हिंदुराव हुजरे-पाटील

Hindurao Hujre Patil State Working President of Sambhaji Brigade warned of agitation in brigade style at a press conference
Hindurao Hujre Patil State Working President of Sambhaji Brigade warned of agitation in brigade style at a press conference

कोल्हापूर :  मराठा आरक्षणावरील स्थगिती उठत नाही तोपर्यंत पोलिस भरती करू नये अन्यथा ब्रिगेड स्टाईलने आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. जिल्हाध्यक्ष शिवाजी खोत, प्रविण पाटील, चेतन पाटील, राजू सावंत, चंद्रकांत पाटील आदि उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, मराटा आरक्षणास स्थगिती असताना पोलिस भरती झाल्यास मराठा समाजातील तरूणांना संधीला मुकावे लागणार आहे. आरक्षणप्रश्‍नी राजकारण न करता कायदेशीर मार्गाने प्रयत्न होणे गरजेचे आहे. संसदेत कायद्याला मंजुरी मिळावी यासाठी केंद्र सरकारवर राजकीय तसेच सामाजिक दबाव आणणे गरजेचे आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरूणांत असंतोष निर्माण झाला आहे. कोरोनाच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करणे योग्य होणार नाही. कायदेशीर लढाच हा त्यावरील पर्याय आहे.स्थगिती असताना पोलिस भरती झाल्यास कायदा तसेच सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. भरती झाल्यास संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन केले जाईल. 

ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन देणे प्रत्येक पालकाला परवडणारे नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या शाळांचे शैक्षणिक शुल्क शासनाने माफ करावे, कोरोनाच्या काळात खासगी दवाखान्यात रुग्णांची लूट सुरू आहे. ज्यांना बिल अवाजवी आहे असे वाटते त्यांनी संभाजी ब्रिगेडशी संपर्क साधावा. 

केंद्र सरकारने सरकारी कंपन्यांचे खासगीकरण थांबवावे,कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. त्यामुळे बंदी तातडीने उठवावी, शेतीमालाला हमीभाव मिळत नसताना केंद्र सरकारने नव्याने विधेयक आणले आहे. शेतकरी विरोधातील धोरणाच्या विरोधात खासदारांची आम्ही भेट घेणार आहे. जे खासदार प्रतिसाद देणार नाहीत त्यांच्यासमोर घरासमोर आंदोलन करू असा इशारा  ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. 

संपादन -  अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com