लोकांची आतडी कुजविणारी हातभट्टी दारू जोरात 

illegal country made liquor factories increase in kolhapur district
illegal country made liquor factories increase in kolhapur district

बालिंगा (कोल्हापूर) : कुजलेली मळी, उसाचा आंबवलेला रस, काळा गुळ, नवसागरचा अतिरिक्त वापर करून गावठी दारू काढणाऱ्यांनी उपनगारातील ओढाचा काठ निवडला आहे. चार पैसे मिळवण्यासाठी लोकांची आतडी कुजविणारी दारू पाजली जात आहे. स्थानिक लोकांपेक्षा काही बाहेरच लोक येवून बालिंगा, पाडळी खुर्द, कोगे गाव परिसरात हातभट्टींचे पेव फुटले आहेत. दिसला ओढा..टाक भट्टी असे चित्र आहे. याकडे उत्पादन शुल्ककडून कारवाई होणे अपेक्षीत आहेत. 

कला, क्रीडा, साहित्य, शिक्षणामध्ये उत्तुंग यश मिळून गावचे नाव उज्जवल करण्याकडे तरूणांचा कल आहे. यातच काही स्थानिक तर काही बाहेरच लोकांनी शहर परिसरातील उपनगरात हात भट्टी जोरात सुरू केल्याचे चित्र आहे. आता ऊस तोडणीपूर्वी कोणाची भट्टी कोठे सुरू आहे. हे समजून येत नव्हते. आता पाडळी खुर्द, बालिंगा, कोगे, वाशी गावच्या हद्दीपर्यंत असणाऱ्या परिसरात साखर कारखान्यांकडून ऊस तोड सुरू आहे. त्यामुळे ओढ्या काठावर असणारे हातभट्ट्या सहजपणे दिसून येत आहे. 
शेतात येणाऱ्या, जाणाऱ्या महिला व पुरूषांची तमा न बाळगता कायदा आपल्या खिशात असल्याच्या अर्विभावात हे काम सुरू आहे. दिवसभर भट्टीतून गावठी दारू काढायची आणि दुपारनंतर ठराविक ठिकाणी हीच विषारी दारू विक्री करून लोकांची आतडी नासवायचे काम केले अविरतपणे सुरू आहे. कुजलेली मळी, उसाचा आंबवलेला रसामध्ये घातलेल्या अतिरिक्त नवसागरचा वास ओढ्या परिसरात येत राहतो. हातभट्टी काढणाऱ्यांना कोणाची भिती राहिली नाही, असेच चित्र दिसून येते. किंवा कोणी कारवाई केली तर त्यातून कसे सुटायचे याची माहिती त्यांना असावी. यामुळेच गावठी काढणारे उजळ माथ्याने आपला बेकायदेशी दारू काढण्याचे काम करत आहेत. 

गावठी दारू काढणाऱ्यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे, शहर परिसरात असणाऱ्या उपनगरामध्ये हे काम राजरोसपणे सुरू आहे. याला तात्काळ आळा घातला पाहिजे. 
- सर्जेराव पाटील, शेतकरी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com