कोल्हापूर हद्दवाढ: विकासासाठी हद्दवाढ गरजेचीच; शहराशेजारच्या गावांत वाढते नागरीकरण 

Kolhapur boundary extension
Kolhapur boundary extension

कोल्हापूर : शहरालगतच्या दक्षिण आणि पूर्वेकडील गावातील कृषी क्षेत्राशी संबंधित नसणाऱ्यांचे प्रमाण हे ५० टक्‍क्‍यांपेक्षा जादा आहे. या गावातील शेती कमी होत असून, नागरीकरणाचा वेग वाढला आहे. यापैकी काही गावे जनगणना नगरे (सेन्सस टाउन) म्हणून ओळखू लागली आहेत. त्यामुळे हद्दवाढ ही काळाची गरजच आहे, असा अहवाल विवेकानंद महाविद्यालयाच्या भूगोल व पर्यावरणशास्त्र विभागातील प्रा. सुनील गुंगा भोसले यांनी तयार केला. या अहवालावरच तत्कालीन भाजप सरकारने २०१७ मध्ये प्राधिकरणाचा पर्याय निवडताना ४२ गावांचा समावेश केला होता. या अहवालानुसार शहराच्या लगतच्या परिघातील गावे आणि शहर यांच्या हद्दी एकमेकांत मिसळल्या असल्याचा निष्कर्ष प्रा. भोसले यांनी काढला आहे.

२००१ आणि २०११ च्या जनगणनेनुसार शहरालगतच्या कळंबा, उजळाईवाडी, गांधीनगर, उचगाव, पाचगाव, मोरेवाडी, गोकुळ शिरगाव, तामगाव या आठ गावांची नोंद जनगणना नगर (सेन्सेक्‍स टाउन) म्हणून झाली आहे. शहरातील लोकसंख्येची घनता दिवसेंदिवस वाढत असून, शहरवाढीचा कल हा दक्षिणेकडील जनगणना नगराकडे असल्याने त्यांची संख्या वाढून शहर नैसर्गिकरीत्या दक्षिण व पूर्व दिशेला वाढत आहे. त्यामुळे या गावांचा विचार हद्दवाढीत व्हावा, असे अहवालात म्हटले आहे.

नागरी संक्रमण पट्ट्यातील गावे
शहराच्या नागरी पट्ट्याने जोडणाऱ्या गावात शिंगणापूर, बालिंगे, पाडळी खुर्द, वाडीपीर, वाशी, कळंबा, पाचगाव, गिरगाव, कंदलगाव, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, मोरेवाडी, तामगाव, मुडशिंगी, सरनोबतवाडी, उचगाव, गांधीनगर, वळिवडे, शिरोली, टोप या २० गावांचा समावेश होतो. पूर्व आणि दक्षिण दिशेची गावे हद्दवाढीच्या दृष्टीने अभ्यासकाला अधिक अनुकूल वाटतात. या गावांच्या हद्दी आणि शहराची हद्द एकमेकांत मिसळली आहे.
अहवालातील नमूद गोष्टी अशा : 
 पालिकेची महापालिका झाल्यापासून  शहराची लोकसंख्या 
    तीन लाखांनी वाढली 
 क्षेत्रफळात एका इंचानेही वाढ नाही
 १९९१ पासून दक्षिण आणि पूर्व दिशेच्या गावात लोकसंख्या 
     वाढीचा वेग अधिक
 या गावातील लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत गेली 
 कृषीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होत आहे
 शेतीसाठी जमिनीचा वापरही कमी होत गेला आहे

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com