कोल्हापूरकर करणार हटके आंदोलन ! मंत्री, खासदार,आमदारांसह एकाही नेत्याला देणार नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

 kolhapur NGO warning  Standing in the river water agitation kolhapur marathi news
kolhapur NGO warning Standing in the river water agitation kolhapur marathi news

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील नेते, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पंचगंगा मरणासन्न अवस्थेत आहे. त्यामुळे पंचगंगा जतन व संवर्धन झाल्याशिवाय त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नाही, अशा आशयाचा फलक आज पंचगंगा घाटावर झळकला. येथील शहरभान चळवळ, विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हे अभिनव आंदोलन केले. 

दरम्यान, एक मार्चपर्यंत पंचगंगा संवर्धनाच्या कामाला प्रारंभ झाला नाही तर एक दिवस नदीच्या पाण्यात उभे राहून आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी शहरभान चळवळीचे फिरोज शेख यांनी दिला.

पंचगंगा प्रदूषणाबरोबरच घाटावरील बुरुज, तटबंदीची दुरवस्था झाली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही. या पार्श्वभूमीवर आता आंदोलन व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आर्किटेक जीवन बोडके, फिरोज शेख, रमेश मोरे, किशोर घाटगे यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com