ईट का जवाब पथॅंर से... कोल्हापूर पोलिसांकडून जागेवर हिशेब चुकता

kolhapur police answer to jodhpur 007 gang
kolhapur police answer to jodhpur 007 gang

कोल्हापूर - कर्तव्य बजवाताना गुंडाशी दोन हात करण्याचा प्रसंग पोलिसांवर वारंवार येतो. अशावेळी कोणी पोलिसांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा हिशेब जागेवर चुकता कसा करायचा हे कोल्हापूर पोलिसांनी वारंवार दाखवून दिले आहे. 

कायदा सुव्यवस्थेची सर्वात मोठी जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर असते. लोकसंख्येचा विचार करता अवघे हजाराच्या घरात असणारे पोलिस कायदा सुव्यवस्थेबरोबर गुन्ह्यांवर वचक ठेवत असतात. 

खाकी वर्दीचा सन्मान, आदर सर्वांनी राखणे हे गरजेचे आहे. पण प्रत्येक जण या वर्दीचा आदर करेल, असे नसते. दीड वर्षापूर्वी वेगवेगळ्या गुन्ह्यात पसार असणारा संशयित "काळबा'ला जेरबंद करण्यासाठी पोलिस यंत्रणा महाडिक माळ परिसरात गेली होती. त्यावेळी त्याने पोलिसांना विरोध केला. त्यावेळी मोठी झटापट होऊन गोळीबारही झाला. पण जीवावर बेतणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाऊन पोलिसांनी त्याला जेरबंद केले. एप्रिल 2019 मध्ये तत्कालिन प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांनी पथकासह यादवनगरातील संशयित मुल्लाच्या मटका अड्डयावर छापा टाकला. त्यावेळी मुल्लाच्या साथिदारांनी थेट पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्याला पोलिसांनी जागेवर उत्तर दिले. तसेच मोका अंतर्गत कारवाई करून वर्दीवर हात टाकण्याचा परिणाम काय होतो हे दाखवून दिले. 

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करताना वाहतूक पोलिसांवरही अनेकदा हल्ले होतात. या हल्ल्यांनाही पोलिसांनी जागेवर चोख उत्तर दिले. दोन दिवसापूर्वी किणी टोलनाक्‍यावरही राजस्थान येथील गुंडांना पकडतानाही गोळीबाराचा थरार घडला. गुंडाच्या पिस्तूलातून बाहेर पडणाऱ्या गोळ्यांना स्वतःचा जीव धोक्‍यात घालून जसास तसे उत्तर देत पोलिसांनी धाडसाचे दर्शन घडविले. 
कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पेलताना जर कोणी खाकीवर्दीवरच उठला तर ईट का जवाब पथॅंरसे देण्यात आम्ही समर्थ असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सिद्ध केले. 

शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले 
सन     दाखल     उघड 
2018     81       79 
2019      59      59 

पोलिसांवरील हल्ले 
2018             11      11 
2019              7       7 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com