चंद्रकांत पाटलांचे विकासात योगदान शून्य - मंत्री हसन मुश्रीफ

kolhapur hasan musrif chandrakant patil
kolhapur hasan musrif chandrakant patil

आजरा - चंद्रकांत पाटील यांना काहीही न करता दोन वेळा पदांवर संधी मिळाली. ते भाग्यवानच आहेत. परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच; कोल्हापूर जिल्ह्याला देखील फायदा झालेला नाही. त्यांचे विकासातील योगदान शून्य आहे, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. 

येथील जनता बॅंकेमध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर, पदवीधरचे अरुण लाड यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या वेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार शीलवान व चारित्र्यवान असल्याने त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. संभाजी तांबेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. 

मुश्रीफ म्हणाले, ‘‘शरद पवार यांची राजकारण व समाजकारणात हयात गेली. दहा ते बारा वेळा लोकसभेच्या व तितक्‍याच विधानसभेच्या निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षणमंत्री व कृषिमंत्री म्हणून योगदान दिले आहे. ते निश्‍चित मोठे आहेत. चंद्रकांत पाटील यांना काही न करता दोन वेळा मोठी संधी मिळाली आहे.’’ 

जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी, उमेश आपटे, मुकुंदराव देसाई, अल्बर्ट डिसोझा, वसंतराव धुरे, तानाजी देसाई, दिलीप लाड यांची भाषणे झाली. या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, विष्णुपंत केसरकर, नामदेव नार्वेकर, सुधीर देसाई, विद्याधर गुरबे, शिरीष देसाई, बशीर खेडेकर, रचना होलम, डॉ. राजलक्ष्मी देसाई, एम. के. देसाई, अनिकेत कवळेकर, अभिषेक शिंपी, रवि भाटले, जनार्दन बामणे, प्रकाश देसाई, पदाधिकारी उपस्थित होते. अनिल देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सभापती उदयराज पवार यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com