बील भरा अन्यथा वीजपुरवठा होणार खंडित 

paschim maharashtra electricity bill payment
paschim maharashtra electricity bill payment

कोल्हापूर  - गेल्या 1 एप्रिल 2020 पासून आजअखेर पश्‍चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील एकूण 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांनी एकदाही वीजबिल भरलेले नाही. या ग्राहकांकडे एकूण 1962 कोटी 27 लाखांची थकबाकी आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील थकबाकी 337 कोटी 48 लाख इतकी आहे. या ग्राहकांनी थकबाकीचा भरणा पुढील तीन आठवड्यात न केल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित करावा, असे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिले आहेत. 

पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये वीजबिलांच्या थकबाकीसह इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच व्हिडिओ कॉन्फरंन्सिग घेण्यात आली. या बैठकीत श्री.नाळे यांनी वरील आदेश दिले. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्यासह पाचही जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

प्रादेशिक संचालक श्री. नाळे म्हणाले, सद्यस्थितीत पुणे (1032.80 कोटी), सातारा (140.36 कोटी), सोलापूर (259.12 कोटी), सांगली (192.54 कोटी) व कोल्हापूर (337.43 कोटी) या जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण 1962 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी 1247 कोटी 49 लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या 14 लाख 29 हजार 811 वीजग्राहकांनी गेल्या 1 एप्रिल 2020 पासून एकाही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. महावितरणकडून वारंवार प्रत्यक्ष संपर्क साधून देखील ग्राहकांनी थकबाकीचा भरणा केलेला नाही. त्यामुळे नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असे श्री.नाळे यांनी सांगितले. 

महावितरणवर मोठे आर्थिक संकट आले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करणे आवश्‍यक आहे. ज्या ग्राहकांना आवश्‍यकता आहे अशा ग्राहकांना वीज बील भरण्यासाठी हप्त्यांची देखील सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर थकबाकीचा भरणा न करणाऱ्या इतर थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा देखील नियमानुसार खंडित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com