esakal | कोल्हापुरातून तब्बल पाच रेल्वेगाड्या अजूनही बंदच ; प्रवाशांची मात्र गैरसोय

बोलून बातमी शोधा

railway service stopped in kolhapur transaction start}

खासदारांनी जोरदार पाठपुरावा करण्याची वेळ आली आहे. 

कोल्हापुरातून तब्बल पाच रेल्वेगाड्या अजूनही बंदच ; प्रवाशांची मात्र गैरसोय
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या काळात वर्षभर कोल्हापुरातून उत्तर व दक्षिण भारतीय नियमित रेल्वेसेवा बंद आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांतून उत्त्तर, दक्षिण भारताकडे धावणाऱ्या रेल्वेगाड्या सुरू झाल्या. मात्र, कोल्हापुरातून तब्बल पाच गाड्या बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे खासदारांनी जोरदार पाठपुरावा करण्याची वेळ आली आहे. 

कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतीत बहुतांशी उत्तर भारतीय कामगार वर्ग आहे. त्याचबरोबर गुजराती बांधवही आहेत. व्यापार, उद्योग, नोकरी व्यवसायांच्या निमित्ताने गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळकडे नेहमी ये-जा करणारा वर्ग आहे. त्यामुळे दर महिन्याला किमान पन्नास हजारावर प्रवासी रेल्वे मिळतात. 

गतवर्षी मार्चमध्ये कोरोना लॉकडाउन सुरू झाले तेव्हापासून कोल्हापूरातून उत्तर भारताकडे सुटणाऱ्या रेल्वे गाड्या बंद आहेत. काही मोजक्‍या विशेष रेल्वेद्वारे उत्तर भारतातील कामगाराना त्यांच्या राज्यात सोडले. त्यानंतरही सेवा बंद झाली ती अद्याप बंदच आहे. लॉकडाउन शिथील झाल्यानंतर कामगार पुन्हा कामाच्या शोधात कोल्हापुरात येऊ लागले. मात्र, रेल्वे सेवा बंद असल्याने त्यांना माल वाहतुकीच्या गाड्या, खासगी आराम गाड्यातून प्रवास करीत त्यांना कोल्हापूर गाठावे 
लागत आहे. 

हेही वाचा - वृद्ध खेळाडूंना मिळाले केवळ चार महिन्यांचे मानधन ; आठ महिन्यांच्या रकमेची प्रतीक्षाच -

जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात जवळपास सर्व व्यवहार पूर्ववत झाले. असे असताना रेल्वे मात्र बंद आहेत. त्यामुळे व्यापार उद्योग नोकरींच्या निमित्ताने उत्तर भारतात किंवा दक्षिण भारतात जाणे मुश्‍कील झाले. पर्याय म्हणून अनेकजन येथून मुंबई किंवा पुण्याला जातात तेथून एखाद्यी विशेष रेल्वे गाडी सापडली तर दक्षिण किंवा उत्तर भारतात प्रवास करतात, अशी स्थिती आहे.

तीन महिन्यात एक दोन वेळा कोल्हापूरच्या तिन्ही खासदारांनी रेल्वे महाव्यवस्थापकांशी चर्चा केली. मात्र पुढे फारसे काही झाले नाही. देशभरात काही ठिकाणी विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून कमी संख्येने या गाड्या आहेत. त्यामुळे खासदारांनीच आता पाठपुरावा करून किमान विशेष रेल्वे गाड्यावरील मार्गावर सुरू कराव्यात अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशांची आहे.

या गाड्या आहेत बंद 

  • कोल्हापूर- दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळूर, सह्याद्री एक्‍स्प्रेस, 
  • कोल्हापूर- सोलापूर, कोल्हापूर- पुणे पॅसेंजर, कोल्हापूर- सातारा पॅसेंजर.

हेही वाचा - नैराश्‍य, तणावातून विष घेण्याच्या प्रकारात वाढ ; समुपदेशनाची आवश्यकता -

"कोल्हापुरातून लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे मागणी केली. मात्र, त्यांनी कोरोनाचे कारण सांगत पाहू, एवढेच उत्तर दिले आहे. सर्वसामान्यांच्या जगण्याला गती देण्यासाठी रेल्वे प्रवास महत्त्वाचा असल्याने खासदारांनी या प्रश्‍नांत तीव्रतेने लक्ष घालून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे."

 - शिवनाथ बियानी, रेल्वे प्रवासी संघटना

संपादन - स्नेहल कदम