कोल्हापुरात मांजराचा अपघात

Rare time cat injured in an accident
Rare time cat injured in an accident

कोल्हापूर : अत्यंत दुर्मीळ काळमांजर (शास्त्रीय नाव - एशियन पाल्म सिवेट) शहरातील उत्तरेश्वर पेठ ते लक्षतीर्थ जाणाऱ्या रस्त्यावर आढळले. 


वाहनाच्या धडकेत जखमी झाल्यामुळे हे काळमांजर येथून जाणाऱ्या युवकांच्या नजरेस पडले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे हे मांजर शहरात चर्चेचा विषय ठरले आहे. तस्करी आणि शिकारीमुळे लोप पावत चाललेले काळमांजर, ज्याला कांडेचोर, काळजा, उदमांजर अशा नावांनीदेखील ओळखले जाते. असे हे मांजर शहरातील उत्तरेश्वरपेठ ते लक्षतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळले. अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या काळमांजराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे या प्राण्याच्या अस्तित्वाबद्दल चर्चा रंगू लागली आहे.

मुळातच दाट जंगलात आढळणारा हा प्राणी रात्रीची शिकार करतो. अनेक मेहनतीने शोधूनदेखील न सापडणारा हा प्राणी नागरी वस्तीजवळ आढळल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जंगलातून हा प्राणी नदीपात्रातून येथपर्यंत आला असण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अंधारात शिकार करणे पसंद करणाऱ्या मांजराचे बेडूक, किडे, लहान उंदीर मुख्य भक्ष्य आहे. काही प्रसंगी हा प्राणी फळे खाऊन देखील गुजराण करू शकतो. शरीराइतकीच लांब याची शेपूट असते.


कॉफी महागडी
कॉफीची फळे खाऊन बी अधिक पक्व करणारा प्राणी म्हणून या काळमांजराची विशेष ओळख आहे. यामुळे या प्राण्याची तस्करी होते. या प्राण्याच्या विष्ठेतून मिळणाऱ्या बियांवर प्रक्रिया करून मिळणारी कॉफी ही सर्वाधिक महागडी आणि उंची समजली जाते. या कॉफीला कोपी लुवाक अथवा सिवेट कॉफी म्हणून ओळखले जाते.

तस्करीमुळे २००८ पासून दुर्मीळ झालेल्या या प्राण्याचा शहर परिसरामधील वावर आश्‍चर्यकारक आहे. या प्राण्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
-  संयोगिता देसाई-माने

संपादन -अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com