VIDEO : महाविकास आघाडी सरकारची बदनामी मी सहन करणार नाही; काय म्हणाले हसन मुश्रीफ पाहा व्हिडिओ

Rural Development Minister Hasan Mushrif criticism on chandrakant patil kolhapur political marathi news
Rural Development Minister Hasan Mushrif criticism on chandrakant patil kolhapur political marathi news

कोल्हापूर : पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारवर बदनामीकारक आणि चुकीचे वक्तव्य  जर कोण  करत असेल तर मला बोलण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. मी चंद्रकांत पाटील यांच्यावर व्यक्तिगत टीका केली नव्हती. भाजपचे हे नाटक आम्ही चालू देणार नाही.असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

ते म्हणाले, इधर उधर की बाते मत कर, ये बता काफिले कैसे गुन्हा. माझे आदरणीय नेते ज्येष्ठ पवार साहेब यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या मीडिया प्रमुखाने नवीन कुमार जिंदल यांनी केलेली टीका ही निषेधार्थ होती. या बद्दल भारतीय जनता पक्षाची भूमिका काय आहे अशी मी मागणी केली होती. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी माफी मागितली नाही. अशा पद्धतीचे निवेदन होते. यामध्ये चंद्रकांत पाटील यांना हस्तक्षेप करण्याची काही गरज नव्हती.

 एवढ्या मोठ्या नेत्यावर आरोप करून माफी मागायची त्यांची इच्छा नाही. उलट  मुश्रीफांना जे करायचे ते करु द्या. मी माफी मागणार नाही. असे पाटील म्हणतात. त्यांना एवढी मस्ती आली कुठून असा सवाल मुश्रीफ यांनी केला.

चंद्रकांत पाटील यांच्याविषयी बोलताना म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात एकाही विधानसभा जागेवर उभारणे त्यांना जमले नाही, त्यामुळेच जिल्हा सोडून ते पुण्याला गेले. भाजप सरकारच्या मागील मंत्रिमंडळात अपघातानेच त्यांना महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा असे दोन नंबरचे स्थान मिळाले होते. कोल्हापुरातून पळून जावं लागलेल्या माणसाने मुख्यमंत्र्यांविषयी बोलणे योग्य नाही.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com