एका गजरे विक्रेत्याची धडपड ; अपंगत्वामुळे निर्माण झालेला प्रश्न लागला मार्गी

रवींद्र पाटील
Friday, 19 February 2021

आजही अनेकांना जीवनात उभारी राहण्यासाठी मदत करतात. असाच एक मदतीचा हात गजरे विक्रेते यांनी महादेव यांना दिला आणि नविन जिद्दीने काम करण्याची ताकद निर्माण झाली.

कबनूर (कोल्हापूर) : आज काल संवेदनशीलता व सामाजिक जाण, भान कमी होत गेली की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  स्वत: ची मुलेच आई बापांना वृद्धाश्रमात पाठवतात. पण  समाजात आजही अनेक लोक असे आहेत. जे आजही अनेकांना जीवनात उभारी राहण्यासाठी मदत करतात. असाच एक मदतीचा हात गजरे विक्रेते यांनी महादेव यांना दिला आणि नविन जिद्दीने काम करण्याची ताकद निर्माण झाली.

आभारफाटा फरांडे मळा परिसरातील दत्तात्रय तानाजी शिंदे या सामाजिक कार्यकर्त्याने महादेव पांडुरंग किल्लेदार या अपघाताने अपंग झालेल्या व्यक्तीच्या पोटापाण्याची सोय व्हावी या सामाजिक जाणिवेने लोकवर्गणीतून पानपट्टीचे दुकान घालून दिले.आज शिवजयंतीचे औचित्य साधून पानपट्टीचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

किल्लेदार हे  यंत्रमाग व्यवसायात  जॉबर  काम करत होते.  त्यांना साप चावल्यावर पायाला मोठी जखम झाली. त्यामध्ये त्यांचा एक पाय निकामी झाला .त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गेली अनेक वर्षे गंभीर बनला होता.ते व त्यांची पत्नी जमेल ते काम करून संसार करतात. किल्लेदार यांच्या अपंगत्वामुळे त्यांची होणारी आर्थिक ससेहोलपट दत्तात्रय शिंदे यांच्या लक्षात आली.   त्यांनी पानपट्टीचे दुकान श्री.विवेकानंद युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून  कबनूर- चंदूर रस्त्यावर घालून देण्याचा संकल्प केला . 

या संकल्पासाठी किल्लेदार यांचा भाचा संजय चोरगे यांनी प्रथम पानपट्टीचा खोका उपलब्ध करून दिला.  शिंदे यांनी लोकवर्गणीतून निधी गोळा करून पानपट्टीच्या दुकानातील सर्व माल घेऊन दिला. यासाठी  विवेकानंद फाउंडेशनचे उत्तम जाधव,सुनील चव्हाण आदी कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

हेही वाचा -  दुर्गरक्षणासह संवर्धनाचा वसा घेऊ हाती! -

या पानपट्टीच्या उद्घाटन प्रसंगी उपसरपंच सुधीर पाटील, माजी उपसरपंच नीलेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम, सुनिता आडके, ग्रामपंचायत सदस्य सुधीर लिगाडे, समीर जमादार, मराठा समाजाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील,अजित लटके, माजी ग्रामपंचायत सदस्य बलराम भोजने, गजानन  आमले,बाळासाहेब कामत,दत्ता पाटील, सागर कोले आदी उपस्थित होते.   

संपादन -अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivjayanti festival help social work in dattatray shinde kabnur marathi news