कोल्हापूराच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा : सेवा रुग्णालयाला ‘कायाकल्प’ पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

चार वर्षांपासून केंद्र शासन आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना पुरस्कार देऊन गौरवते.

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या नॅशनल हेल्थ मिशनतर्फे कसबा बावडा येथील सेवा  रुग्णालयाला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा ‘कायाकल्प’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये असे स्वरूप असून, कोल्हापूर विभागाला हा मान प्रथमच मिळाला आहे.

चार वर्षांपासून केंद्र शासन आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना पुरस्कार देऊन गौरवते. रुग्णालयाची अंतर्गत व बाह्य स्वच्छता, बागबगीचा, सांडपाणी निचरा, जैव वैद्यकीय व घनकचरा व्यवस्थापन, रुग्णांना जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता, वैयक्तिक स्वच्छता व खबरदारी, रुग्णालयाबाहेरील परिसर यावर आधारित गुणांकन केले जाते. 

हेही वाचा- सावधान : धोका कायमच , डिसेंबरमध्ये कोरोनावाढीची शक्‍यता -

डिस्ट्रिक्‍ट हॉस्पिटल, कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र वर्गवारीतून रुग्णालयांची निवड केली जाते. राज्य समितीने जानेवारी-फेब्रुवारीत मूल्यमापन केले होते. सीएचसी विभागातून हा पुरस्कार मिळाला. सीपीआर कोविड रुग्णांवरील उपचारासाठी खुले केल्याने अन्य रुग्णांसाठी हे रुग्णालय आधारवड ठरले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते १८९७ मध्ये रूग्णालयाची पायाभरणी झाली. इमारतही हेरिटेज असून, रूग्णालयाला पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. 
- डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक

अन्य पुरस्कार असे
कम्युनिटी आरोग्य केंद्र : गडहिंग्लज, कागल, गांधीनगर, हातकणंगले, खुपिरे (प्रत्येकी एक लाख रुपये)
प्राथमिक आरोग्य केंद्र : आळते, अब्दुललाट, सरवडे, बोरपाडळे, शिरोली दुमाला, इस्पुर्ली, मलिग्रे, उत्तूर, कणेरी, वाटंगी (५० हजार रुपये) 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State level 2nd kayakalp Award for Service Hospital at Kasba Bawda by National Health Mission of Central Government