आख्ख कोल्हापूर जोतिबा डोंगरावर... 

third jotiba kheta for jotiba
third jotiba kheta for jotiba

जोतिबा डोंगर - जोतिबाच्या नावानं चांगभलं काळभैरव नावानं चांगभलंच्या जयघोषात श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर आज तिसरा खेटा ही गर्दीने ओसंडून गेला. यानिमित्ताने आज अख्ख कोल्हापूर ज्योतिबा डोंगरावर आलं. आजचा रविवार व पुढील रविवार नैवेद्य करण्यासाठी अनुकूल असल्याने आजच बहुतांशी भाविकांनी भाविकांनी पूजाऱ्यांच्या घरी नैवेद्य करण्यासाठी गर्दी केली. ९ तारखेला पौर्णिमा असल्याने खेटयांची सांगता ८ तारखेला होणार आहे . जोतिबा डोंगरावर आज दिवसभर भाविकांच्या झुंडी येत राहिल्या. पहाटे पासूनच कोल्हापूरसह परिसरातील भाविक डोंगरावर आले.

राज्यातील अन्य भाविक सकाळी आठ नंतर डोंगरावर येत राहिल्याने डोंगरावर मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप आले. दरम्यान , कोल्हापुरातील काही भाविकांनी आज पहाटे पंचगंगा नदीत स्नान करून ते अनवाणी पायाने वडणगे निगवे कुशिरे गायमुख तलाव मार्गे  डोंगरावर आले. काही भाविकांनी गायमुख तलाव ,  पायरी वाटेने अनवाणी पायाने डोंगरा पर्यंत  खेटे घातले व दर्शन घेतले.
 आज मंदिरात पाद्यपूजा काकड आरती मुखमार्जन हे धार्मिक विधी झाले. सकाळी अभिषेक वेळी  शरद बुरांडे केदारी उपाध्ये गणेश उपाध्ये बंडा उमराणी  सुरज उपाध्ये यांनी केदार  स्तोत्र, केदार महिमा या विधींचे  पठण केले. सकाळी नऊ वाजता ज्योतिबा देवांची सालंकृत महापूजा बांधण्यात आली. दुपारी बारा वाजता उंट घोडा या मानाच्या प्राण्या समवेत धुपारतीचा  भव्य सोहळा झाला. यावेळी गुलाल खोबरे यांची उधळण करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. रात्री भव्य दिव्य असा पालखी सोहळा झाला. यावेळी  पालखीची मुख्य मंदीराभोवती प्रदक्षिणा काढण्यात आली . या वेळी पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यासाठी गर्दी झाली. या वेळी  देवस्थानचे अधिक्षक महादेव दिंडे  पूजारी सर्व देव सेवक  ग्रामस्थ उपस्थित होते .पालखी सोहळ्यानंतर प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली व पालखी सदरेवर बसली. दरम्यान , आज  पूर्ण गावातून श्वान फिरवून ते मंदिरार भागात सज्ज ठेवण्यात आले . डोंगरावर कोडोली सह जिल्ह्यातील सर्व   पोलीस ठाण्यांचा बंदोबस्त सज्ज होता. आज  पहाटे भाविकांनी हुल्लडबाजी केली पण वेळीच पोलिसांनी रोखल्यामुळे त्यास आळा बसला . त्यानंतर सर्रास भाविकांना सूरळीत दर्शन घेता आले. आज सकाळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पत्नी प्रतिमा पाटील यांनी दर्शन घेतले .

हे पण वाचा - एसटीत तिकिट काढताना जुळवली दोनशे स्थळे 
 
आज  चैत्र यात्रा बैठक 

जोतिबा चैत्र यात्रे निमित उद्या (ता. २ ) पन्हाळा तहसील कार्यालयात तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सर्व विभागांची आढावा बैठक होणार आहे. त्यामध्ये यात्रेत सर्व नियोजन करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता ही बैठक होईल. यात्रेच्या  मुख्य तीन बैठका डोंगरावर होतील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com