सावधान :आरसा नसलेली गाडी चालवताय होणार आता दंड

traveling mirror without bike motorists Action on rto officer in kolhapur
traveling mirror without bike motorists Action on rto officer in kolhapur

कोल्हापूर: विना आरसे वाहन चालविण्याची फॅशनच बनली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (आरटीओ) अशा वाहनचालकांवर लकवकरच कारवाई करण्यात येणार आहे. कागदपत्रे, विमा पॉलिसीसह वाहनांना आरसे बंधनकारक राहणार आहेत. विना आरसे वाहन चालविणाऱ्या वाहनधारकास ५०० रुपयाच्या दंडाची पावती फाडावी लागणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. िस्टव्हन अल्वारिस यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

वाहनांच्या संख्येतही विक्रमी संख्येने वाढ होत आहे. कॉलेजकुमारांच्या हातात सर्रास वाहने दिसत आहेत. नवी पिढी स्टायलिश राहण्याला भर देते. सुरक्षित वाहतुकीसाठी वाहनांच्या दोन्ही बाजूला आरसे लावलेले असतात. मोटार, रिक्षाचालकांना याचा चांगला उपयोग होते, पण शहर परिसरातील मोपेड व मोटारसायकलला अपवादात्मकच आरसे दिसतात. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. आरटीओ कार्यालयाकडून महामार्गावर तीनचाकी, चारचाकी अगर मालवाहतूक वाहनांवर  कारवाई केली जाते, असा समज निर्माण झाला आहे, पण नियम मोडणाऱ्यांना कारवाईचा दणका बसणार आहे.

दोन दिवसांत ४१ वाहने जप्त
 वाहनांचा नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई करण्यास सुरवात केली आहे. 
 याची झलकही दोन दिवसांपूर्वी ४१ वाहने जप्त करून दाखवून दिली. कारवाईत विनावाहन परवाना, विना कागदपत्रे, विमा पॉलिसी, फॅन्सी नंबर प्लेट, मोबाईलवर बोलत वाहन चालविण्यासह आरसे नसणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. 

वाहनचालकांकडे हे आवश्‍यक...
 वाहन चालविण्याचा परवाना
 वाहनांची कागदपत्रे
 विमा पॉलिसी
 पीयूसी प्रमाणपत्र
 वाहनांच्या दोन्ही बाजूचे आरसे

दृिष्टक्षेपात...
 जिल्ह्यात वाहन संख्या ः सुमारे १५ लाख
 दुचाकीची संख्या ः सुमारे १२ लाख

दंडाचे स्वरूप
 विना विमापॉलिसी वाहन : चालक, मालकासाठी ः २००० रुपये
 विना पॉलीसी वाहन चालविणाऱ्या त्रयस्तास ः २३०० रुपये
 विना आरसा दंड ः ५०० रुपये

वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर आरटीओने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. महाविद्यालयीन मुले वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करतात, की नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. 
- डॉ. िस्टव्हन अल्वारिस , प्रादेशिक परिवहन अधिकारी.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com