कोल्हापूरात पावसाचा जोर कायम ; पंचगंगेची पातळी वाढली, जिल्ह्यातील 71 बंधारे पाण्याखाली,  हा मार्ग वाहतुकीसाठी बंद....

निवास चौगले
Wednesday, 5 August 2020

गेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात तब्बल तीनशे दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून बारा तासात पंचगंगेच्या पातळीत तब्बल दहा फुटांची वाढ झाली असून आज सकाळी नऊ वाजता पंचगंगेची पातळी 31 फुटावर होती.
जिल्ह्यातील 71 बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

गेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात तब्बल तीनशे दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात पावसाचा जोर कायम असून आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे पंचगंगेचे पाणी मध्यरात्रीच पात्राबाहेर पडले पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट असून 43 फूट ही धोका पातळी आहे. राधानगरी धरण 80 टक्के भरले असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवांधार  पाऊस सुरू आहे.

हेही वाचा- दरड कोसळल्याची अफवा ...अन्‌ जिल्हाधिकाऱ्यांचा हेलपाटा, वाचा काय घडले चंदगड तालुक्‍यात -

 गगनबावडाव तालुका                                                        गगनबावडा  :-   310 मि.मि
साळवण      :-   324 मि.मि
एकूण          :-   634 मि.मि.
आजची सरासरी :- 317 मि.मि.
आज अखेर एकूण सरासरी :- 2921 मि. मि.

हेही वाचा-मंडळाच्या गणेश मूर्ती गडहिंग्लजहून बेळगावला रवाना, रंगकामासाठी जागू लागल्या रात्री -

सकाळी ९:०० वाजता कोल्हापूर पाणी पातळी​
राजाराम  बंधारा पाणी पातळी ३१ फुट १० इंच आहे. 
(पंचगंगा नदी इशारा पातळी - ३९ फूट व धोका पातळी - ४३ फूट आहे)
एकुण पाण्याखालील बंधारे  : ७१

 

राधानगरीच्या पातळीत अडीच फुटांनी वाढ
राधानगरी  पाणलोट क्षेत्रातील दाजीपूरसह धरणक्षेत्रात २४ तासांत अतिवृष्टी झाली. दाजीपुरात १७८, तर धरणक्षेत्रात ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीने पाण्याची आवक झाल्याने जलाशयाच्या पातळीत २४ तासांत अडीच फुटांनी वाढ झाली. धरण ७२ टक्के भरले असून, साठा सहा टीएमसी झाला. धरणाच्या साठ्यात दोन दिवसांपासून झपाट्याने वाढ सुरू आहे. दरम्यान, काळम्मावाडी धरण क्षेत्रातही अतिवृष्टी ८८ मिलिमीटर झाली. हे धरण ८४ टक्के भरले असून, धरणात १७.४४ टीएमसी साठा झाला आहे.
 

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

राधानगरीच्या पाणीसाठ्यात वाढ 

24 तासात वाढले 1 टीएमसी पाणी 

राधानगरी ८४  टक्के भरले

 

धरणस्थिती
 आलमट्टी : ६९२२ क्‍यूसेक विसर्ग; ५ बंधारे पाण्याखाली 
 राधानगरी : १७१.५९ दलघमी साठा 
 कोयना : ११३९ क्‍युसेक विसर्ग 
 जांबरे मध्यम प्रकल्प भरला

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In twelve hours the level of Panchganga has increased by ten feet and at nine o'clock this morning t level of Panchganga was at 31 feet