विद्यापीठाची परीक्षा म्हणजे अडथळ्यांची शर्यत 

ओंकार धर्माधिकारी  
Wednesday, 14 October 2020

विद्यापीठात परीक्षा नियंत्रकाचे पद चार महिन्यांपेक्षा अधिककाळ रिक्त आहे

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर खरेदीला बराच वेळ लागला. त्यानंतर लगेचच लेखणीबंद आंदोलन सुरू झाले. सुमारे 10 हजार 800 विद्यार्थ्यांनी नोंदणीच केली नाही. अशा अनेक अडथळे पार केल्यानंतर 17 ऑक्‍टोबरला परीक्षा सुरू होणार आहेत. 

विद्यापीठात परीक्षा नियंत्रकाचे पद चार महिन्यांपेक्षा अधिककाळ रिक्त आहे. सारा कारभार हा प्रभारी परीक्षा नियंत्रांवरच सुरू आहे. या विभागातील रिक्तपदेही अधिक आहेत. त्यामुळे परीक्षेच्या कामाला गती येण्यास वेळ लागला. परीक्षा ऑनलाईन होणार असल्याने त्यासाठी आवश्‍यक असाणारे सॉफ्टवेअर खरेदीलाही वेळ लागला. सुरुवातीला केवळ एकच प्रस्ताव आल्याने निविदा प्रक्रिया परत राबवावी लागली. त्यातच कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन सुरू झाल्याने आठ दिवस सर्व कामकाज ठप्प होते. त्यामुळे परीक्षेची तारीख जाहीर करण्यास वेळ लागला. आता शनिवारी (ता.17) या परीक्षा होणार आहेत. 

दृष्टीक्षेप 
ऑनलाईन परीक्षा देणारे विद्यार्थी - 50417 
ऑफलाईन परीक्षा देणारे विद्यार्थी - 13,000 
नोंदणी न केलेले विद्यार्थी - 10,600 
एकूण विद्यार्थी - 74017 

हे पण वाचापरतीच्या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात पाणी ; काढणीला आलेला भात पाण्यात

 

ऑफलाईन परीक्षा केंद्र - 293 (तीन जिल्ह्यांमधील) 
 
परीक्षेसाठी कमी कालावधी हातामध्ये आहे. तरीदेखील सर्व तयारी योग्य दिशेने आणि गतीने सुरू आहे. तांत्रिक किंवा व्यवस्थापकीय कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी सुक्ष्म बाबींचा विचार करून सर्व नियोजन केले जात आहे. शिवाजी विद्यापीठाच्या या परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील याची खात्री आहे. 
- प्रा.डॉ.डी.टी.शिर्के (कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ)

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: university exam is a race of hurdles