वीकेंड लॉकडाउनचा फटका; कोल्हापुर जिल्ह्यात 450 कोटींची उलाढाल ठप्प

weekend lockdown effects on sellers in kolhapur rupees 450 crore working stop
weekend lockdown effects on sellers in kolhapur rupees 450 crore working stop

कोल्हापूर : वीकेंड लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील सुमारे ४५० कोटींची उलाढाल थांबल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अत्यावश्‍यक सेवेतील व्यवसायावरही ७० ते ८० टक्के परिणाम झाला. केवळ लक्ष्मीपुरी बाजारपेठेतील दीड ते दोन कोटींची उलाढाल एकाच दिवशी थांबली. वीकेंडमध्ये अत्यावश्‍यक सुविधा सुरू असल्याचे जाहीर केले असले तरीही त्या सेवांच्या व्यवसायांवरही आज परिणाम झाला. प्रत्यक्षात मटन-चिकण दुकानदारांनाही खुले ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र, त्यांच्याकडे अपेक्षित ग्राहकच आज आले नाहीत. त्यामुळे आज (११) पुन्हा ग्राहक पाहूनच उपलब्धता ठेवण्यात येणार असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

पिठाची गिरणीही अत्यावश्‍यक सेवेत येत असल्याने तीही सुरू ठेवण्यास काहीच हरकत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन दिवसांत होणारी गर्दी पाहता त्यांचा व्यवसाय दुप्पट-तिप्पट झाला. रिक्षा व्यवसाय अटीनुसार परवानगी असली तरीही आज एकही रिक्षा रस्त्यावर दिसत नव्हती. औषध दुकाने सुरू असतानाही त्यांचा व्यवसाय केवळ ३०-४० टक्के झाल्याचे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

कोल्हापूर बाजारपेठेत रोज दहा ट्रक माल येतो आणि जातो. येथेच सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांची उलाढाल होते. तेथील होलसेल किराणा दुकानेही आज बंद होती; तर बाजारही बंद असल्याने संपूर्ण लक्ष्मीपुरी सुनी-सुनी होती. शहरातील विविध मॉल्स, कापड दुकाने, होलसेल मार्केट, इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकानेही बंद असल्याने शहरात ९५ टक्के व्यावसाय आज बंद राहिला. 

सेवा आहे ग्राहक नाही

केएमटी, एसटी, रिक्षा ही सेवा प्रत्यक्षात सुरू असली तरीही त्यांना ग्राहक मिळाला नसल्याने आज या सर्वच वाहतुकीसाठी असलेल्या साधनांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला. सार्वजनिaक वाहतूक बंदच असल्याची स्थिती दिसून आली. यातूनही मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल थांबली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com