सुखाचा संसार सुरू होता, नियतीच्या मनात मात्र वेगळंच होत पण 'या' आधुनिक सावित्रीनं केलं सौभाग्य बळकट....

wife gave mental strength to her husband during his illness in kolhapur
wife gave mental strength to her husband during his illness in kolhapur
Updated on

कोल्हापूर - सुषमा व सुभाष शिंदे हे पती-पत्नी, त्यांची दोन मुले, असे चौकोनी कुटुंब, टिंबर मार्केट परिसरात त्यांचे घर. सुभाष केएमटीमध्ये ड्रायव्हर. यांचा सुखाचा संसार सुरू होता, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होत. साधारण १५ वर्षांपूर्वी सुभाष यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले. छोट्या छोट्या गोष्टी, घटना ते विसरू लागले. त्यांच्या या आजारामुळे नोकरीतही अडचणी येऊ लागल्या. नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. घरचा खर्च भागविण्यासाठी सुषमा या खासगी दवाखान्यात ‘आया’चे  काम करू लागल्या.दिवसेंदिवस सुभाष यांचा आजार वाढू लागला. सीपीआर दवाखान्यासह सहा-सात दवाखान्यांत उपचार घेतले. त्यांना बरे करण्यासाठी राहते घर विकले.

सुषमा यांनी पतीला दिले आजारात मानसिक बळ

सुषमा यांनी पतीला दिले आजारात मानसिक बळ
अनेक प्रयत्नानंतरही त्यांच्या तब्येतीत फरक पडेना. घर विकल्यामुळे राहण्याचा प्रश्‍नही समोर होता.
लग्नात घातलेले मणी मंगळसूत्र विकले. आलेल्या पैशांतून दौलतनगर येथे छोटीशी जागा घेतली. या जागेवर पत्र्याचे शेड मारले. या शेडमध्ये डुकरे, उंदीर, साप असे प्राणी येण्याची भीती. सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत त्या कामाला जायच्या. परंतु पाठीमागे घरात मुले व पती कसे असतील?, याची सतत काळजी लागून राहायची. मुले शाळेला गेल्यानंतर कधी कधी सुभाष घराबाहेर पडायचे. परत येताना मात्र रस्ता आठवायचा नाही. बाहेरच फिरायचे. कामावरून आल्यानंतर पतीला शोधायचे.
पत्नीला होत असलेला त्रास त्यांनाही पाहावला नाही. अशातच त्यांनी स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यानच्या काळात त्यांना दोन हृदयविकाराचे झटकेही आले. अशा नैराश्‍याच्या काळातही सुषमा डगमगल्या नाहीत. एकीकडे नोकरी, मुलांचे शिक्षण व दुसरीकडे पतीचे आजारपण. अशा बिकट परिस्थितीला त्या सामोरे जात होत्या. त्यांच्या या प्रयत्नांचे फलित म्हणून पतीची मानसिक स्थिती पूर्ववत आणण्यात काहीअंशी त्या सफल झाल्या आहेत. पतीच्या आयुष्याची दोरी बळकट राहावी, यासाठी या आधुनिक सावित्रीने संघर्ष केला.

नोकरीचा राजीनामा दिल्याने पेन्शनही पुरेशी नव्हती. म्हणून नोकरी सुरू केली. गेली पंधरा सोळा वर्षे सतत पती बरे व्हावेत, यासाठी झटत आहे.
- सुषमा शिंदे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com