धक्कादायक! मोबाईलवर व्हिडिओ चित्रिकरण करत 25 वर्षीय तरुणीची आत्महत्या

youth suicide case in kolhapur
youth suicide case in kolhapur

कोल्हापूर : पाचगाव परिसरातील आर.के.नगर येथे एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. धनश्री अप्पा जाधव (वय २५) असे तिचे नाव आहे. करवीर पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करून तिने आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती  

धनश्री जाधव मूळची आजरा तालुक्‍यातील आहे. ती गेली दोन वर्षे पोस्टल कॉलनी (आर. के. नगर) येथे भाडेकरू म्हणून राहत होती. ती सध्या एका बॅंकेत क्रेडिट कार्ड मार्केटिंगचे काम करीत होती. तिने गळफास लावून घेतल्याचे काल (ता. २)  रात्री उघडकीस आले. पोलिसांना एका डायरीत व चिठ्ठीत वैयक्तिक आयुष्य आणि भविष्याविषयी लिहिलेला मजकूर सापडला. पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले, की तिने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ चित्रीकरण आणि व्हिडिओ कॉल केला.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com