त्यांनी बनवली चिमण्यासाठी कृत्रीम घरटी

sparrow3.jpg
sparrow3.jpg

सोलापूर: स्पॅरो पार्क प्रयोगाच्या माध्यमातून चिमण्यांसाठी केलेली कृत्रिम घरटी आता चिमण्यांच्या चिवचिवाटाने गजबजू लागली आहेत. अनेक कारणाने माणसापासून दूर गेलेल्या चिमण्या आता घरट्यात विसावू लागल्या आहेत. 

घरबांधणीच्या नव्या तंत्रात आता कोनाडे किंवा कोपरे आता केले जात नाहीत. त्यामुळे घरात चिमण्या आता घरटी करू शकत नाहीत. पीओपीची घरे, कोनाडे नसलेल्या भिंती यामुळे हाउस स्पॅरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिमण्यांचे नाते तुटण्याची वेळ आली आहे. अंगणात दाणे टिपणे, पाणी पिणे व घराच्या कोनाड्यात घरटी करणे या गोष्टी कमी झाल्या. 

त्यावर उपाय म्हणून "निसर्ग माझा'चे संस्थापक अरविंद म्हेत्रे व निसर्गमित्र शिक्षक मुकुंद शेटे यांनी मंद्रूपच्या आनंदवनात कृत्रिम घरटी बसवली. काही व्यवसायात काही मोठे प्लास्टिकचे पाईप रोल रेडियम टेप गुंडाळण्यासाठी मिळतात. या रोलचे छोटे तुकडे कापून एका बाजूने ते बंद केले जातात. नंतर या घरट्याला समोरील भागात चिमण्यांना बसण्यासाठी बांबुची काडी जोडली जाते. ही घरटी घराच्या वरच्या भागात लटकवली जातात. सुरवातीला ही 30 घरटी बसवून त्याचे परिणाम पाहिले. तेव्हा काही दिवसांत तेथे चिमण्यांनी या पाइपमध्ये घरटी केल्याचे दिसून आले. या कृत्रिम घरट्यांमध्ये गवताच्या काड्या, पिसे, वाळलेली पाने यापासून चिमणी पिल्लांसाठी निवारा बनवते. या पद्धतीने "स्पॅरो-पार्क' प्रकल्प प्रत्यक्षात अस्तित्वात आला. 
जुळे सोलापुरातील सिद्धेश्‍वर पार्कमध्ये मग 30 घरटी बसवण्यात आली. ज्या ठिकाणी ही घरटी बसवलेली आहेत, तिथे बऱ्याच ठिकाणी चिमण्यांचा अधिवास संपन्न होऊन छोटी-छोटी पिले तयार होऊन ती आता उडूनही जात आहेत. नंतर मंद्रूप, दयानंद कॉलेज, आदित्यनगर, जुळे सोलापूर, बक्षी हिप्परगा, अक्कलकोट, पंढरपूर, सोलापूर अशा विविध ठिकाणी अनेक घरटी बसवलेली आहेत. 

प्रत्येक घरी बनावे एक घरटे 
त्यामुळे प्रत्येकाने किमान एक घरटे आपल्या घरच्या वरच्या बाजूला छताखाली बसवावे. प्रत्येक घरामध्ये व दुकानामध्ये किमान एक तरी घरटे बसवले जावे. ही घरटी स्वतःला तयार करता येणे शक्‍य आहे. 
- अरविंद म्हेत्रे, संस्थापक, निसर्ग माझा मंडळ, सोलापूर 


बिल्डरांनी नेचर हार्मनी जपावी 
बांधकाम व्यावसायिकांनी देखील घराचे डिझाईन तयार करताना घराच्या अगदी वरच्या बाजूला कोपरे ठेवावेत. कोनाडे तयार करावेत, जेणेकरून पक्ष्यांना त्या ठिकाणी आसरा मिळेल. निसर्गाशी मिळतेजुळत्या तयार घरांचा प्रचार केला जातो. त्यानूसार अनेक चिमण्यांना घरटी मिळतील व रहिवाशांना निसर्ग सान्निध्याचा अनुभव येऊ शकेल. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com