esakal | "या' शहर व तालुक्‍यात 738 जणांची कोव्हिड चाचणी; 30 जण बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Test

देशात आणि राज्यात कोरोना साथीचा संसर्ग सुरू झाल्यानंतर पंढरपूर शहर व तालुक्‍यात अडीच महिन्यांनंतर मुंबईहून आलेला पहिला कोरोनाचा बाधित रुग्ण पंढरपूर तालुक्‍यातील उपरी गावात सापडला होता. त्यानंतर शहर व तालुक्‍यात आठ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. सुरवातीला स्वॅब घेण्यासाठी रुग्णांना सोलापूरला पाठवले जात होते. रुग्णांची सोय व्हावी म्हणून लोकवर्गणीतून वाखरी येथे तालुक्‍यातील पहिले स्वॅब सेंटर सुरू करण्यात आले. 

"या' शहर व तालुक्‍यात 738 जणांची कोव्हिड चाचणी; 30 जण बाधित 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्‍यात आतापर्यंत तब्बल 738 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जास्तीत जास्त लोकांची कोरोना चाचणी व्हावी यासाठी पंढरपूर शहरात दोन तर ग्रामीण भागात एक असे तीन स्वॅब सेंटर सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती नगरपालिका आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली. 

हेही वाचा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होणार अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा साधेपणाने 

श्री. परदेशी म्हणाले, की देशात आणि राज्यात कोरोना साथीचा संसर्ग सुरू झाल्यानंतर पंढरपूर शहर व तालुक्‍यात अडीच महिन्यांनंतर मुंबईहून आलेला पहिला कोरोनाचा बाधित रुग्ण पंढरपूर तालुक्‍यातील उपरी गावात सापडला होता. त्यानंतर शहर व तालुक्‍यात आठ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. सुरवातीला स्वॅब घेण्यासाठी रुग्णांना सोलापूरला पाठवले जात होते. रुग्णांची सोय व्हावी म्हणून लोकवर्गणीतून वाखरी येथे तालुक्‍यातील पहिले स्वॅब सेंटर सुरू करण्यात आले. काही दिवसांतच आठही रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. तालुका कोरोनामुक्त झाला होता. दरम्यान, आषाढी यात्रेच्या तोंडावर पुन्हा शहरात कोरोना विषाणूने तोंड वर काढले आहे. अवघ्या आठ दिवसांतच नव्या 22 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आजअखेर शहर व तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या 30 वर गेली आहे. त्यापैकी आठ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 22 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज पुन्हा शहरात पाच तर ग्रामीण भागात दोन अशा सात रुग्णांची भर पडली आहे. 

हेही वाचा : अगोदर ऍक्‍शन प्लॅन सोलापूरचा लॉकडाउन 

शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता नगरपालिकेच्या वतीने संत गजानन महाराज मठ आणि कॉलरा हॉस्पिटल येथे स्वॅब सेंटर सुरू केले आहेत. यामध्ये शहर व तालुक्‍यातील 728 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यामुळे शहरात गर्दीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून सामाजिक अंतर ठेवणे आवश्‍यक आहे. पालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली जात असल्याचेही श्री. परदेशी यांनी सांगितले.