सुमेध फाऊंडेशनच्या नारी नवशक्ती पुरस्कारांचे वितरण 

nari puraskar.jpg
nari puraskar.jpg

सोलापूरः कोरोनाच्या ह्या वैश्विक महामारीच्या अस्थिर काळात स्त्रियांनीच जगाला नव्या उमेदीने जगण्याचे बळ दिले. या लढाई मध्ये प्रत्येक महिलेने योध्याप्रमाणे कामगिरी बजावली. लॉकडाउन काळात हताश न होता महिलांनी आत्मनिर्भर होऊन मास्क, पी.पी.ई.कीट आणि इतर वैद्यकीय साहित्याच्या निर्मितीच्या माध्यमातुन स्वयंरोजगारसह रोजगार निर्मिती केली, असे मत इंदिरा कुडक्‍याल यांनी व्यक्त केले. विविध क्षेत्रात प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या नऊ महिलांचा सुमेध फाऊंडेशनच्या वतीने नारी नवशक्ती पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. 

 
यावेळी बोलताना सुमेध फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी माखीजा यांनी सांगितले की, भारतीय स्त्रीया सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन स्वतःच्या कामाचा ठसा उमटविला आहे असे सांगितले. कोरोना विषाणु विरुद्धच्या लढाई मध्ये लॉकडाऊन काळात स्त्रियांनी संपूर्ण परिवारच्या आरोग्याची काळजी आणि खबरदारी समर्थपणे पेलली असे सकारात्मक विचार विजया वड्डेपल्ली यांनी मांडले. भारताच्या आरोग्य सेवकांनी अमुल्य अशी कामगिरी बजावुन कोरोना संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली असे विचार डॉ.वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ.पुष्पा अग्रवाल यांनी व्यक्त केले. 

सुमेध फाऊंडेशन सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या काळात भरिव कामगिरी करून समाजापुढे आदर्श निर्माण करेल असे मनोगत विजय कुंदन जाधव यांनी त्यांच्या प्रस्ताविकेत स्पष्ट केले. सिमंतीनी चाफळकर, वृषाली गोसकी, अंबिका पाटील, आश्‍लेषा पिंपलकर, सरोजिनी तमशेट्टी, शोभा घंटे कोळी, नेहा रोडा, सोनाली घोंगडे, स्वप्नाली चालुक्‍य गोयल ह्या नऊ जणींना सुमेध फाऊंडेशनच्या वतीने यंदाचा नारी नवशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी जगताप यांनी केले तर आभार कार्तिकी गाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सुमेध फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा रती माखीजा, राज माखीजा, अर्जुन अष्टगी, सचिन जगताप, संदीप पिस्के, प्रसाद खोबरे, पल्लवी माने यांनी परिश्रम घेतले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com