esakal | कोरोनाच्या आडून भाजपचे राजकारण; कोण म्हणाले असे वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Doing politics from BJP on the background of Corona

कोरोना विषाणूच्या संकटामुळे अवघे जग हतबल झाले आहे. अशा संकटकाळी देशाचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे महाविकास आघाडीचे सरकार उत्तमरित्या काम करीत आहे अशा संकटावेळी सर्वांनी एकत्रितपणे येऊन हातात हात घालून काम केले पाहिजे. मात्र सत्तेचे डोहाळे लागलेले भाजप कोरोनाच्या आडून राजकारण करीत आहे. हे दुर्दैवच म्हणावे लागेल, अशी खंत माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या आडून भाजपचे राजकारण; कोण म्हणाले असे वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अनगर (सोलापूर) : कोरोना विषाणूच्या संकटामुळे अवघे जग हतबल झाले आहे. अशा संकटकाळी देशाचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे महाविकास आघाडीचे सरकार उत्तमरित्या काम करीत आहे अशा संकटावेळी सर्वांनी एकत्रितपणे येऊन हातात हात घालून काम केले पाहिजे. मात्र सत्तेचे डोहाळे लागलेले भाजप कोरोनाच्या आडून राजकारण करीत आहे. हे दुर्दैवच म्हणावे लागेल, अशी खंत माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केली.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नुकतीच सोशल मीडियावर माजी आमदार राजन पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात कोरोना ची स्थिती गंभीर होत चालली आहे याबाबत मी शरदचंद्र पवारसाहेब व अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केली आहे असे सांगत कठीण परिस्थतीत तालुक्याचा कुटुंबकर्ता म्हणून जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. मात्र सगळेच काही शासनाने करावे असे नाही. शासन त्यांचे काम अत्यंत उत्तमरीत्या करीत आहे. नागरिकांनी ही आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे विनाकारण बाहेर न पडता आपल्या बरोबर आपल्या कुटुंबियांची काळजी घेतली पाहिजे असे सांगत कोव्हीड - 19 साठी आमदार यशवंत माने यांनी आपल्या निधीतून 50 लाख रुपये प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दिले आहेत तर त्यांच्यासह आमदार बबनदादा शिंदे , आमदार भारत भालके , आमदार शहाजी पाटील , आदींच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे 

हेही वाचा : ‘या’ कार्डमुळे शेतकऱ्यांना मिळणार तीन लाख कर्ज; कसे मिळणार कार्ड वाचा
सरकार चालविण्याचा अनुभव नसतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परिस्थिती उत्तम हाताळली आहे. तर निष्ठा ही भाषणातून नाही तर आपल्या कृतीतून दाखवायची असते असे एका प्रश्नाला उत्तर देताना श्री. पाटील म्हणाले ते पुढे म्हणाले की , कोरोनामुळे चालू उन्हाळ्यात 20 लाख मेट्रिक टन साखरेचा वापर कमी झाला आहे. तर मागील वर्षी निर्यात केलेल्या साखरेचे निर्यात शुल्क अद्याप केंद्र सरकारने दिले नाही देशातील एकूण साखर उत्पादनापैकी 30 टक्के साखर उत्पादन महाराष्ट्रात होते त्यामुळे केंद्र सरकारने साखर निर्यात धोरण लवकरात लवकर स्वीकारले पाहिजे असेही श्री पाटील यावेळी म्हणाले. 

go to top