बाजारात बियाणे मागणी व पुरवठ्याचा ताळमेळ नसल्याने शेतकरी झाले त्रस्त  

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 25 जून 2020

यावर्षी खरीप हंगामाच्या बाजारपेठेत लॉकडाउनमुळे अनेक अडचणी होत्या. महाबीजचे बियाणे बाजारात पुरेशा प्रमाणात पोचले नाही. बियाणांचा पुरवठा कमी झाल्याने शेवटी शेतकऱ्यांना इतर कंपन्यांचे बियाणे विकत घेण्याची वेळ आली. विशेषतः कांद्याची मागील वर्षीच्या दरानुसार बियाणांची किंमत लागली. नंतरच्या काळात कांदा इतका स्वस्त झाला की कांदा बियाणे त्या तुलनेत महाग ठरले. तरीही बियाणे पुरवठा अपुराच होता. सोलापूरमध्ये कोरोना संसर्ग जास्त असल्याने वाहतूकदार माल घेऊन येण्यास तयार होत नाहीत. ही देखील बियाणे कंपन्यांची अडचण झाली. 

सोलापूरः शहरातील बाजारपेठेत लॉकडाउनमुळे बियाणांचा पुरवठा केवळ 20 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. पहिला पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांकडून बियाणांच्या मागणीला जोर आला. मात्र, मालच नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होऊ लागली आहे. 

हेही वाचाः अक्कलकोटकरांची चिंता वाढली, गुरुवारी आढळले आठ कोरोनाबाधित 

यावर्षी खरीप हंगामाच्या बाजारपेठेत लॉकडाउनमुळे अनेक अडचणी होत्या. महाबीजचे बियाणे बाजारात पुरेशा प्रमाणात पोचले नाही. बियाणांचा पुरवठा कमी झाल्याने शेवटी शेतकऱ्यांना इतर कंपन्यांचे बियाणे विकत घेण्याची वेळ आली. विशेषतः कांद्याची मागील वर्षीच्या दरानुसार बियाणांची किंमत लागली. नंतरच्या काळात कांदा इतका स्वस्त झाला की कांदा बियाणे त्या तुलनेत महाग ठरले. तरीही बियाणे पुरवठा अपुराच होता. सोलापूरमध्ये कोरोना संसर्ग जास्त असल्याने वाहतूकदार माल घेऊन येण्यास तयार होत नाहीत. ही देखील बियाणे कंपन्यांची अडचण झाली. 

हेही वाचाः सोलापूरकरांनो शिस्त पाळा अन्यथा, लॉकडाउन 

येथील बाजारात सोयाबीनची मागणी चार ते पाच टन एवढी असते. विशेषतः मराठवाड्याला लागून असलेल्या पट्ट्यात सोयाबीनाचा पेरा भरपूर होतो. मात्र, सोयाबीन बियाणाचा सर्वाधिक पुरवठा मराठवाडा व विदर्भात होतो. सोलापूर भागात एकूण पुरवठ्याच्या तुलनेत अगदी थोडा पुरवठा होता. हा पुरवठा देखील लॉकडाउनमुळे विस्कळित झाला आहे. त्यामुळे सोलापूरच्या बाजारात देखील सोयाबीन अगदी कमी प्रमाणात उपलब्ध झाले. तुरीचे बियाणे उपलब्ध झाले होते. मात्र, उडीद बियाणे शेतकऱ्यांना मिळालेच नाही. लॉकडाउनमुळे अनेक कंपन्यांचा कारभार बंद असल्याने बियाणांचा पुरवठा अपुरा पडला आहे. महाबीजचे बियाणे वेळेवर पोचले नाही. त्यामूळे शेतकऱ्यांना पर्यायी  बियाणे शोधावे लागले. 
त्यातच या वर्षी खरीप हंगामात पहिलाच पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची धावपळ सुरू केली. पाऊस सुरवातीलाच चांगला झाला तर आता पुढेही राहील या अंदाजाने शेतकरी बियाणांची मागणी करीत आहेत. बाजारात शेतकऱ्यांची मागणी पुरवण्यासाठी व्यापारी माल पुरवठ्याअभावी हतबल झाल्याची स्थिती आहे. 

बाजारात पुरवठ्याची अडचण 
या वर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांकडून बियाणे व खतांची खरेदीची मागणी वाढली. लॉकडाउन मध्ये घटलेले उत्पादन व वाहतुकीच्या अडचणीने बियाणे व खतांचा पुरवठा अपुरा पडला आहे. 
- गुंडाप्पा पंचे, अध्यक्ष बियाणे, पेस्टीसाईड व फर्टीलायझर असोसिएशन  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are suffering due to lack of supply and demand of seeds in the market