क्रिकेट प्रशिक्षणाच्या संधीचे सोलापूरच्या मुलींनी केले सोने

mulinche cricket.jpg
mulinche cricket.jpg

सोलापूरः मुलींना शाळांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्याचे काम कठीण असले तरी प्रत्यक्षात या खेळाडू उत्तम करिअर करू शकतात हे रागीणी वुमन्स क्‍लबने चालवलेल्या प्रयत्नातून सिध्द झाले आहे. या क्‍लबने दिलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक खेळाडू मैदाने गाजवत आहेत. 

मल्लिनाथ याळगी यांनी काही वर्षापूर्वी क्रिकेट खेळ मुलींनाही खेळता आला पाहिजे असा विचार करत प्रयत्न सुरू केले. मुलींसमोर सर्वात मोठा प्रश्न प्रशिक्षणासाठी लागलेल्या शुल्काचा होता. या कारणासाठी बहुतांश मुली खेळाच्या प्रशिक्षण घेऊ शकत नाही हे त्यांना लक्षात आले. सोलापूर शहरात मुलीसाठी एक स्वतंत्र क्रिकेट प्रशिक्षण सूरू करावे यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केली. 

रागिणी वुमेन्स क्रिकेट क्‍लब नावाने त्यांनी क्‍लबची स्थापना केली. स्वतःच्या मुलीला प्रशिक्षणात सहभागी करून त्यांनी ही सुरुवात केली. 
त्यांनी क्रिकेट साठी लागणारे सर्व साहित्य खरेदी केले. महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख यांना प्रशिक्षणाची माहिती दिली तेव्हा त्यांनी ताबडतोब जागा व इतर सोयी उपलब्ध करून दिल्या. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबर्सू यांनी देखील महिला क्रिकेट वाढावी या साठी मोठे सहकार्य केले. 
तेव्हा पासून या वुमन्स क्‍लबच्या पंचवीस ते तीस मुली नियमीत सरावाला येत असतात. प्रशिक्षक एस.व्ही.शिवाळ हे त्यांना प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षणातून मुलीचे संघ तयार झाले. अनेक मुलींनी शाळा स्तरावर होणाऱ्या क्रिकेट स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली. 
अगदी शहरापासून दुर राहणाऱ्या मुली देखील नियमित सराव करतात. श्राविका शाळेतील क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे यांनी प्रशिक्षणासाठी पाठवलेली विद्यार्थीनी प्रसिध्दी जोशी ही पुढे राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत चमकली. प्रशिक्षणातून तयार झालेली अंजली चिट्टे हिने राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. ऋतू भोसले हिने विद्यापीठ संघाचे नेतृत्व केले. क्‍लबमधील एकूण नऊ मुलींनी विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केले. प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींना मॅचेस चा अनुभव देण्यासाठी क्‍लबने अनेक स्पर्धामध्ये संघ सहभागी केले. अंबाजोगाईला पहिल्यांदा केलेल्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद मिळाले आणि पुढील वर्षी विजेतेपद आणले. हरियाणा, दिल्ली, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यात या क्‍लबच्या खेळाडूंनी मोठी कामगिरी बजावली आहे. या खेळाडूंनी बांगलादेश, नेपाळ येथील संघासोबत सामने खेळत चांगली कामगिरी केली. माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी सातत्याने या कामासाठी मार्गदर्शन करत असतात. शहरातील इतर भागात मुलींना प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच कुमठा व विजापूर रोड भागात देखील क्‍लबच्या वतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर स्वामी यांनी मुलीसाठी मल्लखांब प्रशिक्षण सुरू करण्याची सुचना क्‍लबला केली आहे. 
माजी महापौर शोभा श्रीशैल्य बनशेट्टी यांच्या मार्गदर्शनासह रागिणी सावळगी, पद्मा वेळापूरे, रुपा कुताठे, चंद्रकांत रेम्बुर्सू, के. टी. पवार, नजीर शेख, उदय डोके, सुनील ढोले, किशोर बोरामणी, राहुल कुमणे, दिलीप आवाड, विठ्ठल कुंभार, सुहास छंचूरे, श्री. पाटील, श्री.माने, दता बडगू, राजेश येमुल, रवींद्रनाथ आमणे, विजय बिराजदार, प्रशिक्षक एस. बी. शिवाळ, 
उपक्रमात नेहमीच सहभाग देत आहेत. 


चांगला प्रतिसाद 
शहरात मुलींना इच्छा असुनही केवळ आर्थिक अडचणीने क्रिडा प्रशिक्षणाची संधी मिळत नाही. त्यांना संधी मिळवून देण्याचा प्रयत्न क्‍लबच्या माध्यमातून केला जात आहे. त्याला मुलींचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो. 
- मल्लिनाथ याळगी, अध्यक्ष रागिणी वुमेन्स क्रिकेट क्‍लब, सोलापूर  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com