दिव्यांग निर्मलाच्या कुटुंब जगवण्यासाठीच्या लढाईला हवी मदतीची साथ 

प्रकाश सनपूरकर
Sunday, 18 October 2020

उत्तर सोलापूर तालुक्‍यात हगलूर गावातील निर्मला पांडुरंग गायकवाड या एका साधारण कुटुंबातील मुलगी आहे. लहानपणीच पायातील शक्ती कमी होत गेली व नंतर पुढेही गुडघ्याखाली पायाने साथ देण्याचे सोडले. तरी घरात थोरली असलेल्या निर्मलावर घराची जबाबदारी होती. तिचा संघर्ष अगदी तेव्हापासून सुरू झाला. पायाचा त्रास सहन करत हा शिक्षण चालू ठेवले. सुरवातीला गावातील शाळेत व नंतर सोलापूरात वसतीगृहात राहून शिक्षण घेतले. नंतर पायाच्या अडचणीमुळे त्यांनी घरबसल्या शिक्षण घेत तिने दहावी व बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 

सोलापूरः स्वतःच्या अपंगत्वावर मात करत असताना स्वावलंबनातून थोरली लेक म्हणून कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचा तिचा निर्धार आहे. वृध्द मातापिता, लहान भाऊ व बहिणींना जगवण्याच्या निर्धारासाठी ती परिस्थितीशी लढत आहे. छोट्याशा खेड्यात राहून घर व कुटुंब सावरण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नाला खरी साथ हवी आहे ती समाजातील दानशुरांची...ही कहाणी आहे हगलुरच्या निर्मलाची. 

हेही वाचाः अंजुमन ए इस्लाम संस्थेचा सर सय्यद एक्‍सलेन्स पुरस्काराने सन्मान 

उत्तर सोलापूर तालुक्‍यात हगलूर गावातील निर्मला पांडुरंग गायकवाड या एका साधारण कुटुंबातील मुलगी आहे. लहानपणीच पायातील शक्ती कमी होत गेली व नंतर पुढेही गुडघ्याखाली पायाने साथ देण्याचे सोडले. तरी घरात थोरली असलेल्या निर्मलावर घराची जबाबदारी होती. तिचा संघर्ष अगदी तेव्हापासून सुरू झाला. पायाचा त्रास सहन करत हा शिक्षण चालू ठेवले. सुरवातीला गावातील शाळेत व नंतर सोलापूरात वसतीगृहात राहून शिक्षण घेतले. नंतर पायाच्या अडचणीमुळे त्यांनी घरबसल्या शिक्षण घेत तिने दहावी व बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 

हेही वाचाः शेतकरी ते उद्योजिका सारिका पाटील यांचा प्रवास 

तोपर्यंत कुटुंबाची स्थिती बदलली. मजुरी करणारे त्यांचे बाबा थकले व त्यांच्या आईला दिसणे कमी झाले. लहान भाऊ असल्याने तो स्वतःच्या पायावर अद्याप उभा राहिला नाही. निर्मला यांची बहिण प्रमिला या माहेरीच त्यांच्या दोन मुलासह राहण्यासाठी आल्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आईवडील, निर्मला, प्रमिला व त्यांची दोन मुले व लहान भाऊ एवढ्या मोठ्या परिवाराचा घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्‍न निर्माण झाला. घरातील थोरले भावंड म्हणून निर्मला स्वतःच्या भविष्याचा प्रश्‍न बाजुला ठेवून कुटुंब जगवण्यासाठी धडपड सुरू केली. व्हिलचेअरच्या मदतीने किमान किराणा दुकान चालवता येईल, असा प्रयत्न त्यांनी सुरू केला. 
शासकीय कार्यालये किंवा मदत मिळण्याच्या ठिकाणी जायचे तर चालण्याची अडचण हा प्रश्‍न निर्मला यांच्या समोर होता. तरीही त्या स्थितीत मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे व अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी निर्मला यांची परिस्थितीसोबत असलेली धडपड समजून फर्निचर व किराणा सामानाची मदत योजनेतून करून दिली. पण दुकानासाठी लागणारे शेड नसल्याने पुन्हा प्रश्‍न उभा राहिला. पडक्‍या घरात किराणा सामान ठेवण्यास जागा नाही. पावसाने माल खराब होणार म्हणून अडचण झाली. 
कोणत्याही स्थितीत एक स्वतंत्र शेड उभे करण्यासाठी निर्मला गायकवाड यांचा प्रयत्न सुरू आहे. एक पंधरा बाय पंधरा फूट आकाराचे पत्राचे शेड उभे झाले तर त्यातून कायमचा रोजगार मिळेल व कमाईतून वृध्द आई वडिलांना व भावंडाना सांभाळता येईल, यासाठी निर्मला यांचा प्रयत्न सुरू आहे. या कामासाठी त्यांना आता मदतीची साथ हवी आहे. 

त्यांना हवी आर्थिक मदत 
मदत करण्यासाठी निर्मला गायकवाड यांचा बॅंक तपशिल व संपर्क असा आहे. 
कुमारी निर्मला पांडुरंग गायकवाड. 
A/c no- 070018210017524 
Ifsc code no- BKID0000700 
बॅंक ऑफ इंडिया, चाटी गल्ली, सोलापूर. 
कुमारी निर्मला पांडुरंग गायकवाड ः 9619980403, 
पांडुरंग हाके ः 9552094440  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helping Divyang Nirmala's family fight for survival