रेल्वे मालधक्‍क्‍याच्या माथाडी कामगारांना मिळाले तीन हजारांचे अनुदान 

प्रमोद बोडके 
Friday, 28 August 2020

कोरोनाच्या भीतीमुळे सोलापुरातील मालधक्का मार्चमध्ये बंद पडला होता. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह रेल्वे प्रशासन व कामगार यांच्या पुढाकारातून एप्रिलमध्ये सोलापुरातील मालधक्का पुन्हा सुरू झाला. त्यामुळे ऐन लॉकडाउनच्या कालावधीत सोलापुरात अन्नधान्याचा तुटवडा पडला नाही. ज्या माथाडी कामगारांनी स्वत:चा जीव धोक्‍यात घातला, त्यांच्यासाठी शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी हुंडेकरी असोसिएशन व माथाडी कामगार युनियनच्या वतीने लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडे करण्यात आली होती. 

सोलापूर : राज्यातील बांधकाम कामगारांसाठी ज्या पद्धतीने सुरक्षा विमा योजना राबविली जाते आणि अनुदान दिले जाते, त्याच धर्तीवर रेल्वे मालधक्का तथा माथाडी कामगारांनाही मदत द्यावी, या मागणीसाठी माथाडी युनियन आणि हुंडेकरी असोसिएशनच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत होता. या पाठपुराव्याला यश आले असून, 300 माथाडी कामगारांना प्रत्येकी तीन हजार रुपयांच्या अनुदानाचा धनादेश मिळाला आहे. 

हेही वाचा : गौरी-लक्ष्मीच्या सणाला दरवाजा उघडा ठेवला अन्‌ चोरट्याने... 

सहाय्यक कामगार आयुक्त नीलेश येलगुंडे, कामगार अधिकारी साळुंके यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 300 माथाडी कामागारांना प्रत्येकी तीन हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संकटातही पाच-सहा महिन्यांपासून माथाडी कामगार जीव धोक्‍यात घालून परिश्रम करत आहेत. त्यांच्या मदतीसाठी हुंडेकरी असोसिएशन आणि माथाडी संघटनांच्या वतीने शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. 

हेही वाचा : सोलापूर जिल्ह्यात युरियाची पुरेशा प्रमाणात उपलब्धता 

कोरोनाच्या भीतीमुळे सोलापुरातील मालधक्का मार्चमध्ये बंद पडला होता. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह रेल्वे प्रशासन व कामगार यांच्या पुढाकारातून एप्रिलमध्ये सोलापुरातील मालधक्का पुन्हा सुरू झाला. त्यामुळे ऐन लॉकडाउनच्या कालावधीत सोलापुरात अन्नधान्याचा तुटवडा पडला नाही. ज्या माथाडी कामगारांनी स्वत:चा जीव धोक्‍यात घातला, त्यांच्यासाठी शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी हुंडेकरी असोसिएशन व माथाडी कामगार युनियनच्या वतीने लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडे करण्यात आली होती. यातील काही मागण्या मान्य झाल्या असून, उर्वरित मागण्यांसाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार असोसिएशन व संघटनेने घेतला आहे. 

याबद्दल सोलापूर हुंडेकरी असोसिएशनचे अध्यक्ष बाबूराव घुगे म्हणाले, रेल्वे मालधक्‍क्‍यावर शासनाची पहिलीच मदत मिळाल्याचा आनंद आहे. कष्टकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न यानिमित्ताने काही प्रमाणात सुटला आहे. प्रशासनाकडून व शासनाकडून आमच्या इतर मागण्यांसाठीही अशाच पद्धतीचे सहकार्य मिळावे, ही अपेक्षा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mathadi workers of railway maldhakka received a grant of three thousand rupees