ब्रेकींगः पुणे बोर्डाने ठरविली निकालाची तारीख

तात्या लांडगे
शनिवार, 23 मे 2020

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उत्तरपत्रिका जमा करून पुण्याला पाठविण्याचे वेळापत्रक निश्‍चित केले आहे. त्यानुसार 31 मेपर्यंत सर्व उत्तरपत्रिका पाठवाव्यात. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत लावण्यासाठी सर्व नियामकांनी काउंटर फाइल फाडून जमा कराव्यात, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे

सोलापूर: बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर विषय शिक्षकांकडे तपासण्यासाठी आलेल्या उत्तरपत्रिका लॉकडाउनमुळे अडकल्या होत्या. आता निकालास विलंब लागणार नाही, याची खबरदारी घेत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उत्तरपत्रिका जमा करून पुण्याला पाठविण्याचे वेळापत्रक निश्‍चित केले आहे. त्यानुसार 31 मेपर्यंत सर्व उत्तरपत्रिका पाठवाव्यात. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत लावण्यासाठी सर्व नियामकांनी काउंटर फाइल फाडून जमा कराव्यात, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. जूनअखेर निकाल जाहीर करण्याचे नियोजन केले जात आहे. 

हेही वाचाः जनता मरणाच्या दारात, अन सरकार आपल्या घरात 

सोलापूर जिल्ह्यातील उत्तरपत्रिका पाठवायचे नियोजन 

- 23 मे : सुलाखे हायस्कूल (बार्शी) या ठिकाणी बार्शी, करमाळा, माढा या तालुक्‍यांतील उत्तरपत्रिका सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत जमा करायच्या आहेत. 

- 24 मे : कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (पंढरपूर) येथे पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा व सांगोला तालुक्‍यातील उत्तरपत्रिका जमा करणे आवश्‍यक आहे. 

- 31 मे : छत्रपती शिवाजी हायस्कूल (सोलापूर) या ठिकाणी सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट तालुक्‍यातील उत्तरपत्रिका जमा करून पुण्याला पाठवायच्या आहेत. 

हेही वाचाः सरकारचा निर्णय -विद्यार्थ्यासाठी आता करीअर पोर्टल 

नगर जिल्ह्यातील असे आहे वेळापत्रक 

- 27 मे : कर्जत, श्रीगोंदा, जामखेड या ठिकाणच्या उत्तरपत्रिका महात्मा गांधी विद्यालय (कर्जत) येथे जमा कराव्यात 

- 28 मे : भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल (नगर) येथे नगर शहर-ग्रामीण, पारनेर, पाथर्डी, राहुरी येथील उत्तरपत्रिका जमा कराव्यात 

- 29 मे : संगमनेर, अकोले येथील उत्तरपत्रिका भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात (संगमनेर) जमा कराव्यात. 

- 30 मे : के. जे. सोमय्या हायस्कूल (श्रीरामपूर) येथे श्रीरामपूर, नेवासा, राहाता, शेवगाव, कोपरगाव येथील उत्तरपत्रिका जमा कराव्यात 

पुण्यातील उत्तरपत्रिका जमा करण्याचे नियोजन 

- 22 मे : भोर येथील उत्तरपत्रिका राजा रघुनाथराव विद्यालय (भोर) येथे सकाळी 10 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत जमा कराव्यात 

- 22 मे : शिवाजी ज्युनिअर कॉलेज (चेलाडी, नेसरापूर) येथील उत्तरपत्रिका वेल्हा येथे दुपारी 2 ते 4 या वेळेत जमा करायच्या आहेत 

- 26 मे : पिंपरी-चिंचवड, मावळ या परिसरातील उत्तरपत्रिका प्रतिभा ज्यु. कॉलेज (चिंचवड) येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जमा कराव्यात  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune HSC board decided exam result date