लॉकडाउनमध्ये परप्रांतीयांना थांबवून दिला सुरक्षित रोजगार

bandhkam.jpg
bandhkam.jpg

सोलापूरः कोरोना संकट व लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार त्यांच्या मूळगावी परतले आहेत. विशेष रेल्वेगाड्यांद्वारे त्यांना सोडण्यात आले. पण, पश्‍चिम बंगालचे 22 कामगार मात्र महाराष्ट्रात सुरक्षित असल्याची खात्री कुटुंबीयांना देत काम करीत आहेत. हा आगळा प्रकार चिंचोळी एमआयडीसी भागात पाहण्यास मिळाला. 
चिंचोळी एमआयडीसी भागात बांधकाम व्यावसायिक कल्पेश जव्हेरी यांचे बांधकाम सुरू आहे. त्यांच्या कामावर मागील काही महिन्यांपासून पश्‍चिम बंगालमधील कामगार कामावर होते. सेंट्रिंग व बांधकामावरील इतर ते कामे करत असतात. कोरोना संकट व नंतर लॉकडाउन सुरू झाले. जिल्हाभरातील अनेक कामगार त्यांच्या मूळगावी परतले. तेव्हा या कामावर असलेल्या 11 कामगारांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. 

इतर 22 कामगारांच्या कुटुंबीयांचा देखील गावी परतण्याचा आग्रह सुरू होता. सर्वत्रच कोरोनाच्या भयावहतेचा प्रसार झालेला होता. नंतर या कामगारांनी श्री. जव्हेरी यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. तेव्हा जव्हेरी यांनी त्यांना सांगितले, की एकतर प्रवासात गर्दीमुळे संसर्ग होऊ शकतो. तसेच कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर व मास्कची सोय केलेली आहे. तसेच कामावर इतर व्यक्तींची गर्दी नसल्याने कोणताही संसर्गाचा धोका नाही. याशिवाय खाण्याची व राहण्याची सोय देखील केलेली आहे. या गोष्टीचा विचार करावा असे त्यांनी सांगितले. 

पश्‍चिम बंगालचे कामगार सर्वसाधारणपणे दुर्गापूजेच्या दिवसांत त्यांच्या मूळगावी परत जात असतात. अजूनही दुर्गापूजा उत्सवाला काही महिने शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांनी काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. एकूण 22 कामगारांनी काम चालू ठेवले. कामाच्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक कल्पेश जव्हेरी यांनी मास्क बंधनकारक केले आहे. तसेच सॅनिटायझरने हात धुण्याचा नियम लावला आहे. त्याच ठिकाणी राहण्याची सोय असल्याने बाहेर कुणाही लोकांसोबत मिसळून संसर्ग होणार नाही ही देखील सोय झाली. त्यामुळे हे कामगार लॉकडाउनला न घाबरता काम करीत आहेत. 

सुरक्षिततेची साधने पुरवली 
आम्ही कामगारांना सर्व सुरक्षिततेची साधने पुरवली आहेत. त्यांना संसर्ग होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. त्यांना देखील कमाई बुडवून जाणे योग्य वाटले नाही. त्यामुळे ते काम करीत आहेत. 
- कल्पेश जव्हेरी, बांधकाम व्यावसायिक 

आम्ही कामावर कायम 

माझे गाव पश्‍चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्ह्यात आहे. लॉकडाउनमुळे घरच्या मंडळीचा गावी परतण्याचा आग्रह होता. मात्र त्यांची मी समजूत घातली. आम्ही 22 कामगार कामावर आहोत. 
- प्रमोद रॉय
मालदा जिल्हा (प. बंगाल)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com