अधिक मासासाठी चांदीचे फॅन्सी दिवे, निरंजन, नंदादीप खरेदीचे आकर्षण 

chandi vastu.jpg
chandi vastu.jpg

सोलापूर ; यंदा 19 वर्षांनतंर आश्‍विन अधिक मास आजपासून सुरू झाला आहे. अधिक मास हा पुरुषोत्तम मास किंवा धोंडा महिना म्हणूनही ओळखला जातो. अधिकामासानिमित्त जावयाला चांदीच्या वस्तु दिल्या जातात. या महिन्यात विविध प्रकारची दाने देखील दिली जातात. अधिकमासाच्या निमित्त चांदीच्या बाजारपेठेत फॅन्सी दिवे, लामण दिवे, निरंजन, नंदादीप या सारख्या दिव्यांच्या प्रकारासह अनेक प्रकारच्या चांदीच्या वस्तु उपलब्ध झाल्या आहेत. 

अधिक मासात या वस्तूंची दान व जावयांच्या कौतुकासाठी विशेष खरेदी केली जाते. दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास धार्मिकदृष्ट्या विशेष महिना मानला जातो. या मासामध्ये जावयांना चांदीच्या वस्तू देण्याची परंपरा असते. 

विवाह परंपरेमध्ये हुंडा पध्दत कमी होत गेली तसेच कुटुंबे विभक्त झाल्याने एका कुटुंबात एक किंवा दोनच मुली असतात. त्यामुळे अधिकामासातील जावयांचे कौतुक मागील पिढ्यांच्या तुलनेत वाढले आहे. अधिक मासात जावयांना बोलावून त्यांचा आदर सत्कार केला जातो. त्यासोबत विविध धार्मिक दानासाठी देखील वस्तू खरेदी केल्या जातात. या शिवाय मंदिरामध्ये चांदीच्या वस्तू दान मोठ्या प्रमाणात दिले जाते. 
अधिकस्य अधिक फलम या सुभाषितानुसार अधिक मासात केलेले दान अधिक शुभ मानले जाते. या महिन्यात महिला त्यांची चांदीची जोडवी नवी करुन घेणे किंवा जुन्या जोडव्यातील चांदी वाढवून घेतात. त्यामुळे नविन जोडवी किंवा चांदी वाढवण्याची कामे अधिक प्रमाणात होता. तसेच पायाच्या तिसऱ्या बोटामध्ये घातली जाणारी बिच्छवे व पायातील पैंजन देखील खरेदी केली जातात. 
दिपदानाला अधिक मासात मोठे महत्त्व आहे. चांदीच्या दिव्यांचे अनेक प्रकार अधिकामासानिमित्त खरेदी केली जातात. यामध्ये चांदीचे निरंजन, नाशिक घाटाची समई, फॅन्सी नक्षीची समई, नंदादीप, लामनदिवा असे प्रकार असतात. फॅन्सी प्रकारात देवदास दिवा हा एक प्रकार उपलब्ध झाला आहे. मराठवाडी परंपरेत चांदीचे धोंडे जावयांना दिले जातात. तशा प्रकारचे धोंडे विक्री होतात. या सोबत बेलाची पाने, ताट, फळांचे बाऊल, विविध देवतांच्या चांदीच्या मूर्ती आदीं वस्तूंची खरेदी होते. 
सराफा व्यापारी मिलिंद वेणगुरकर यांनी सांगितले की, अधिकमासात चांदीच्या वस्तूची खरेदी अधिक प्रमाणात होत असते. जोडवी नविन करण्यापासून ते दानासाठी लागणाऱ्या चांदीच्या वस्तू दिल्या जातात. हा महिन्याचे पावित्र्य विशेष असल्याने दानासाठी लागणाऱ्या चांदीच्या वस्तुंच्या खरेदीचे प्रमाण वाढते. सराफा व्यावसायिक गिरीश देवरमनी यांनी सांगितले की, गुरुपृष्यामृत हे सोने खरेदीसाठी तसे अधिकमास हा चांदी खरेदीसाठी महत्वाचा असतो. महिला जोडवीमध्ये चांदी वाढवून घेण्याचे काम याच महिन्यात करण्याची मोठी परंपरा आहे. या शिवाय चांदीचे ताट,वाटी, तांब्या, पेले, दिवे अशा वस्तुंना महत्व दिले जाते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com