विद्यार्थी आधार कार्ड नोंदणी शिवाय संचमान्यतेची होणार अडचण

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 17 जून 2020

नवीन आधार कार्ड काढण्याबाबत प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी गटशिक्षणाधिकारी व महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर यांना पत्राद्वारे आदेशित केले आहे. शाळांचे नव्या वर्षातील ऑनलाइन संचमान्यतेकरिता सरल डाटाबेस प्रणालीतील विद्यार्थी पोर्टलवर आधार क्रमांकाची नोंद असलेले विद्यार्थ्यांची माहिती शाळेचा पट म्हणून विचारात घेतली जाणार आहे.

वाळूज(सोलापूर): शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची नोंद केली नाही हे विदयार्थी संचमान्यतेमधून वगळले जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड नाहीत त्यांची आधार नोंदणी देखील शाळांनी करून घ्यावी असे आदेश शिक्षण खात्याने काढले आहेत.  

हेही वाचाः माढा तालुक्‍यात बिबट्या सदृष्य प्राण्याचा रेडकु, शेळीवर हल्ला 

नवीन आधार कार्ड काढण्याबाबत प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी गटशिक्षणाधिकारी व महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर यांना पत्राद्वारे आदेशित केले आहे. शाळांचे नव्या वर्षातील ऑनलाइन संचमान्यतेकरिता सरल डाटाबेस प्रणालीतील विद्यार्थी पोर्टलवर आधार क्रमांकाची नोंद असलेले विद्यार्थ्यांची माहिती शाळेचा पट म्हणून विचारात घेतली जाणार आहे. आधार क्रमांकाची ऑनलाइन नोंद नसलेले विद्यार्थी हे संच मान्यतेच्या गणनेतून वगळण्यात येणार आहेत, असे या आदेशात म्हटले आहे.या संदर्भाने "एनआयसी'मार्फत ऑनलाइन सरल प्रणालीमध्ये विद्यार्थी पोर्टल मुख्याध्यापक लॉगीनवर आधार क्रमांकाची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

हेही वाचाः सेतु केंद्र, ई महासेवा केंद्र सुरू करण्यास सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी 

परंतु विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शाळेकडे तसेच पालकांकडे असताना देखील बऱ्याच शाळांनी सरल विद्यार्थी पोर्टलवर आधार क्रमांक अपडेट केलेले नसल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या शाळेत शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक स्टुडंट पोर्टलवर अपडेट केलेले नाहीत त्यांच्या आधार क्रमांकाची ऑनलाइन नोंदणी पूर्ण करावी. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नाहीत अशा विद्यार्थ्यांचे नजीकच्या आधार केंद्रावर आधार कार्ड काढण्याची कार्यवाही करावी. आधार कार्ड काढणाऱ्या संबंधित कार्यालयाच्या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्वच व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढले जातील. आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांचे नवीन आधार कार्ड काढण्याची जबाबदारी संबंधित शाळा मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखावर देण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Aadhar card registration will be a problem.