"व्हीव्हीपॅट'ने वाढविली "ईव्हीएम'ची पारदर्शकता 

logo
logo

सोलापूर : आपल्याकडे महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका 2019 मध्ये झाल्या. या निवडणुकीत पहिल्यांदाच इव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. ईव्हीएमवर घेतल्या जाणाऱ्या संशयाला व्हीव्हीपॅटमुळे काही प्रमाणात आळा बसला आहे. व्हीव्हीपॅटमुळे या प्रक्रियेत काही प्रमाणात पारदर्शकता आली असली तरीही घटणारा निवडणुकीचा टक्का हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे.
हेही वाचा - वळसे-पाटलांचे सोलापूर जिल्ह्यात जंगी स्वागत 
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर झाला. या निवडणुकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांत काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र व्हीव्हीपॅटबाबत योग्य प्रशिक्षण दिल्याने ही निवडणूक लोकसभेच्या तुलनेत सुरळीत पार पडली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील बहुतांश मतदार संघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का घटल्याचे समोर आले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानादिवशी जिल्ह्यात झालेल्या पावसाचा मोठा परिणाम मतदानाची टक्केवारी घटण्यावर झाला असल्याचे समोर आले होते. मतदानाच्या जागृतीसाठी आणखी प्रभावी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. शहरी भागातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न अपेक्षित आहेत. 
हेही वाचा - व्यवस्थेची माती; स्मार्ट सोलापुरातील नागरिक का आहेत त्रस्त 
यंदाच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून निवडणूक प्रक्रिया सुलभ व सुटसुटीत केली आहे. निवडणूक कालावधीतील तक्रारीसाठी, निवडणुकीची व उमेदवाराची माहिती सर्वसामान्यांना मिळावी यासाठी स्वतंत्र मोबाईल ऍप विकसित केले आहेत. त्यामुळे मतदारांना व उमेदवारांना घरबसल्या सहजपणे ही प्रक्रिया पाहता आली, या प्रक्रियेत सहभागी होता आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com