'वंचित'च्या रणरागिणी आता मैदानात...राज्य कार्यकारणी जाहीर 

तात्या लांडगे
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

  • 13 जणांची महिला कार्यकारणी बुधवारी जाहीर 
  • रेखा ठाकूर राज्य महिला कार्यकारणीच्या अध्यक्षा 
  • सोलापुरातील अंजना गायकवाड यांचा समावेश 
  • 11 जिल्ह्यांमधील महिलांना राज्य कार्यकारणीवर संधी 

सोलापूर : वंचित बहूजन आघाडीने आता राज्य महिला कार्यकारणी जाहीर केली असून त्यामध्ये ईशान्य मुंबई (मुलूंड), अकोला, अमरावती, बुलढाणा (सिंदखेड राजा), वाशिम, परभणी, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, पुणे, जळगाव व सांगली जिल्ह्यातील महिलांना संधी मिळाली आहे. रेखा ठाकूर यांची वंचित बहूजन आघाडीच्या राज्य महिला कार्यकारणीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

हेही नक्‍की वाचा : बळीराजाला फटका : अवकाळीमुळे नुकसान नसल्याचा अहवाल 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर बॅकफूटवर गेलेली वंचित बहूजन आघाडी विविध प्रश्‍नांवर आंदोलन करुन उभारी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरुध्द ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत मोर्चा काढला. आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर मोर्चा काढला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर वंचित बहूजन आघाडीने महिलांची राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलनाला निश्‍चितपणे महिलांचे पाठबळ वाढेल, असा विश्‍वास पक्षाला वाटतोय. कार्यकारणीतील महिला पदाधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याची चर्चा आहे. 

हेही नक्‍की वाचा : आमदार प्रणिती शिंदेंनी माफी मागावी : 'वंचित'ची मागणी 

राज्य कार्यकारणीतील महिला पदाधिकारी 

रेखा ठाकूर : अध्यक्ष 
अरुंधती शिरसाठ : महासचिव (ईशान्य मुंबई) 
डॉ. निशा झेंडे : उपाध्यक्ष (अकोला) 
सविता मुंढे : उपाध्यक्ष (अमरावती) 
डॉ. गजाला खान : उपाध्यक्ष (बुलढाणा) 
डॉ. विजया चव्हाण : सचिव (परभणी) 
किरण गिऱ्हे : सदस्य (वाशिम) 
रोहिणी टेकाळे : सदस्य (पुणे) 
अंजना गायकवाड : सदस्य (सोलापूर) 
डॉ. अभिलाषा गावातुरे : सदस्य (चंद्रपूर) 
निर्मला बनशिव : सदस्य (पुणे शहर) 
शमिभा पाटील : सदस्य (जळगाव) 
डॉ. क्रांती सावंत : सदस्य (सांगली) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VANCHIT Bahujan AAGHADI declares state BODY