ग्रामसेवकाविरोधात 94लाखांच्या अपहाराचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

ग्रामपंचायतीचे दफ्तर त्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे. ते ग्रामपंचायत कार्यालयात ठेवणे बंधनकारक असतानाही ठेवले नाही.

अकोले : दफ्तर गहाळ करून सुमारे 94 लाख 17 हजार 692 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शेणीत व आंबेवंगण येथील तत्कालीन ग्रामसेवकाविरुद्ध राजूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाऊसाहेब महादेव रणसिंग, असे या ग्रामसेवकाचे नाव आहे.

 हेही वाचा  निवडणुकांची रणधुमाळी 

याबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी काशिनाथ सरोदे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, शेणीत व आंबेवंगण येथे नोव्हेंबर 2013 ते मे 2018 या काळात ग्रामसेवक रणसिंग कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या ताब्यातील ग्रामनिधी, चौदावा वित्त आयोग, पेसा ग्रामसभा कोष निधी व पाणीपुरवठा निधीच्या खात्यावरील एकूण 94 लाख 17 हजार 692 रुपयांचा अपहार, तसेच अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता न घेता नियमबाह्य खर्च करून हे दफ्तर गहाळ केले. बॅंक स्टेटमेंटप्रमाणे हा अपहार केल्याचे दिसत आहे. त्यांच्या कालावधीतील आर्थिक व्यवहार व दफ्तर ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही. 

हेही वाचा वडगाव गुप्ता शिवारात जलसमृद्धी 

दफ्तर स्वतःच्या ताब्यात

ग्रामपंचायतीचे दफ्तर त्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे. ते ग्रामपंचायत कार्यालयात ठेवणे बंधनकारक असतानाही ठेवले नाही. त्यामुळे तपासणी करता आली नाही. शेणीत ग्रामपंचायतीचे 75 लाख 69 हजार 504 रुपये, तर आंबेवंगण ग्रामपंचायतीचे 18 लाख 48 हजार 188 रुपये, असा एकूण 94 लाख 17 हजार 692 रुपयांचा अपहार केल्याचे दिसत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 94 lakh fraud against Rural Development Officer